बाल न्याय मंडळांची कर्तव्ये, भूमिका कार्यक्रम
By Admin | Updated: February 8, 2016 00:42 IST2016-02-08T00:42:45+5:302016-02-08T00:42:45+5:30
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने बाल न्याय मंडळ यांची कर्तव्ये,

बाल न्याय मंडळांची कर्तव्ये, भूमिका कार्यक्रम
भंडारा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने बाल न्याय मंडळ यांची कर्तव्ये, भूमिका व जबाबदारी याविषयी शिबिर कार्यक्रम पोलीस बहुउद्देशिय सभागृह येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.जे. अकर्ते, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एम.एस. लोणे, मोहाडी येथील तिसरे सह दिवाणी न्यायाधीश आर.व्ही. डफरे, बाल न्यायमंडळ अध्यक्ष डॉ.विशाखा गुप्ते, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी एम.एम. आंबेडारे, जिल्हा वकील संघ, भंडारा, पोलीस पाटील, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विशेष बाल पोलीस पथक व जिल्हा विधी सेवा प्राधिकराण कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक न्यायाधीश एम.एस. लोणे यांनी केले. त्यांनी बाल न्याय मंडळ यांची कर्तव्य, भूमिका व जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.
न्यायाधीश आर.व्ही. डफरे यांनी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यामध्ये बालकांना कशाप्रकारे त्याचे संगोपन केले जाते. जेणेकरून बाल गुन्हेगार हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल, याबाबत पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले.
डॉ.विशाखा गुप्ते, यांनी बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती, विशेष बाल पोलीस पथक प्रतिनिधी, महिला बाल विकास अधिकारी, बाल संरक्षण कक्ष प्रतिनिधी, चाईल्ड लाईन व इतर बाल गुन्हेगारांसाठी वेगवेगळ्या समित्या व त्याचे संरक्षण कक्ष कशाप्रकारे कार्य करते, याविषयी स्लाईड शो द्वारे असे मार्गदर्शन केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी बाल न्याय मंडळाची कर्तव्य, भूमिका व जबाबदारी याविषयी पोलिसांची भूमिका काय आहे, अशा गुन्ह्यामध्ये पोलिसांनी कोणती कार्य करावयला पाहिजे यावर प्रकाश टाकला. बाल गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी समाजातील प्रत्येक स्तरावर याची जाणीव जागृती कशाप्रकारे व्हायला पाहिजे, याबाबत पोलीस पाटील यांना योग्य ते दिशानिर्देश दिले. बालकांना गुन्हेगारीपासून दूर कसे ठेवता येईल यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. संचालन प्रभारी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी एम.एम. आंबेडारे यांनी केले. आभार प्रदर्शन न्यायाधीश एम.एस. लोणे यांनी केले. या कार्यक्रमाला २०० नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला. (नगर प्रतिनिधी)