लेखणीबंद आंदोलनामुळे दोन हजारांवर फायलींचा ढीग
By Admin | Updated: July 20, 2016 00:42 IST2016-07-20T00:24:10+5:302016-07-20T00:42:59+5:30
चौथ्या वेतन आयोगापासून लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांवर वेतन तफावतीचा अन्याय होत आहे.

लेखणीबंद आंदोलनामुळे दोन हजारांवर फायलींचा ढीग
नाशिक : सोमवारी (दि.१८) पश्चिम प्रभाग समितीच्या सभेत मेनरोड, रविवार कारंजा परिसरातील अतिक्रमणप्रश्नी वादळी चर्चा झडल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाने मंगळवारी शालिमार ते रविवार कारंजापर्यंत रस्त्यातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली. यावेळी दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली. पश्चिम प्रभाग समितीच्या सभेत विनायक पांडे आणि यतिन वाघ यांच्यासह अजय बोरस्ते यांनी अतिक्रमणप्रश्नी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यामुळे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी येत्या २२ जुलैला केवळ अतिक्रमण या विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलाविली आहे. परंतु, प्रभागच्या बैठकीत झालेल्या जोरदार चर्चेनंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाने मंगळवारी दुपारी शालिमार ते गाडगे महाराज पुतळा चौक, धुमाळ पाइंट आणि रविवार कारंजा भागातील रस्त्यावरील हातगाड्या, अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली. (प्रतिनिधी)