यापुढे शहरी-ग्रामीण भागात ्रकेरोसिनचे समान वितरण
By Admin | Updated: September 23, 2015 00:51 IST2015-09-23T00:51:50+5:302015-09-23T00:51:50+5:30
राज्यातील ग्रामीण व शहरी भागात यापूर्वी असलेले केरोसीन वितरणाचे परिमाण वेगवेगळे होते.

यापुढे शहरी-ग्रामीण भागात ्रकेरोसिनचे समान वितरण
वितरणाचे नवीन धोरण : गॅस जोडणीधारकांना वगळले
भंडारा : राज्यातील ग्रामीण व शहरी भागात यापूर्वी असलेले केरोसीन वितरणाचे परिमाण वेगवेगळे होते. मात्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देतांना न्यायालयाने केरोसीन वाटपाबाबत शासनाने सुधारित धोरण तयार करावे, असे आदेश १ जुलै २०१५ रोजी दिलेत. उच्च न्यायालायाच्या आदेशानुसार शासनाने केरोसीन वाटपाबाबत नवीन धोरण जाहिर केले असून बिगर गॅस शिधापत्रिका धारकांसाठी आता प्रती व्यक्ती प्रमाणे परिमाण निश्चित करण्यात आले आहे.
सन २००१ पूर्वी ग्रामीण व शहरी भागातील केरोसीन वाटपाचे प्रमाण समान होते. मात्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देतांना २००१ मध्ये न्यायालयाने ह्यगरिब जनतेची केरोसीनची गरज जास्त असते व गरिब जनता मुख्यत्वे ग्रामीण भागात राहात असल्याने, शासनाने ग्रामीण व शहरी भागाकरिता केरोसीनचे समान परिमाण ठरविण्यात बाबत पुर्नविचार करावा, असे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार शासनाने ३१ मार्च २००१ च्या शासन निणार्यानुसार ग्रामीण, शहरी भागात केरोसीनचे प्रमाण निश्चित केले.
शहरी भागातील मुख्यत्वे मुंबई, ठाणे या शिधावाटप क्षेत्रातील बिगर गॅस शिधापत्रिका धारकांच्या परिमाणात कपात झाली. यावर लोकप्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनानुसार पुन्हा एकदा ३१ मार्च २००१ अन्वये लागू केलेले केरोसीनचे परिमाण ८ जुन २००१ मध्ये रद्द करण्यात आले व पूवीर्चेच केरोसीन वाटप परिमाण लागू करण्यात आले. शासनाने सध्या निश्चित केलेल्या परिमाणानुसार केरोसीन मिळत नसल्यामुळे कडुजी पुंड यांनी २०१४ मध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर निर्णय देतांना शासनाने सुधारित केरोसीन वाटपाचे धोरण ठरविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. यानुसार शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आता शिधापत्रिकेवरील व्यक्तींच्या संख्येनूसार केरोसीन वाटप होणार आहे. यामध्ये एका व्यक्तीला २ लिटर, दोन व्यक्तीस ३ लिटर आणि तीन व्यक्ती व त्याहून अधिक व्यक्तींसाठी ४ लिटर याप्रमाणे यापुढे केरोसीन वाटप होईल. पूर्वी एक गॅस जोडणी असणा-या शिधापत्रिका धारकाला ४ लिटर केरोसीन मिळत होते. मात्र या नवीन धोरणानूसार राज्यातील एक व दोन गॅस जोडणी शिधापत्रिका धारकास वार्षिक १२ गॅस सिलेंडर सवलत दराने मिळत असल्यामुळे त्यांना केरोसीन मिळणार नाही. (शहर प्रतिनिधी)