कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीत शुकशुकाट

By Admin | Updated: September 15, 2016 00:35 IST2016-09-15T00:35:54+5:302016-09-15T00:35:54+5:30

आजच्या संपात जिल्ह्यातील सुमारे १५०० च्यावर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

Due to the suspension of employees, the Zilla Parishad, the Panchayat Samiti, Shukushkat | कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीत शुकशुकाट

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीत शुकशुकाट

भंडारा : आजच्या संपात जिल्ह्यातील सुमारे १५०० च्यावर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे जिल्ह्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदचे कामकाज आज पूर्णपणे ठप्प पडले होते. 
दरम्यान जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक विनिता साहू व मुख्य कार्यकारी अधिकारी अहेरे यांना निवेदन देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

नागरिकांना मनस्ताप
मागील १५ दिवसांपासून ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे ग्रामविकासाची कामे अडकली आहेत. आज जिल्हा परिषद कर्मचारी संपात सहभागी झाल्याने येथे आलेल्या अनेकांना आल्यापावली परतावे लागले.

मोहाडीतही कर्मचारी संपात सहभागी
मोहाडी : मांगली येथील ग्रामसेवक दत्ता जाधव हे आपले कर्तव्य पार पाडीत असताना त्यांना मारहाण झाली. मारहाण करणाऱ्यांवर तसेच चार पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मोहाडी पंचायत समिती तालुका कृती समितीच्या वतीने काम बंद आंदोलन केले. यावेळी पं.स. च्या कर्मचाऱ्यांनी धरणे देवून मारहाणीचा निषेध केला. खंडविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामसेवक संघटना अध्यक्ष दिगांबर गभणे, सतीश गिते, शाम कुंभलकर, समन्वय समिती अध्यक्ष सुरेश मस्के, एच. चौधरी आदी कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Due to the suspension of employees, the Zilla Parishad, the Panchayat Samiti, Shukushkat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.