सोंड्याटोला सिंचन प्रकल्पावर दुष्काळाचे सावट

By Admin | Updated: July 24, 2015 00:37 IST2015-07-24T00:37:56+5:302015-07-24T00:37:56+5:30

३५ हजार शेतकरी व त्यांचे कुटुंबियांना आधारवड असणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पावर यंदा अपुरे पाऊस आणि नियोजनअभावी दुष्काळाचे सावट आहे.

Due to the sondito irrigation project drought | सोंड्याटोला सिंचन प्रकल्पावर दुष्काळाचे सावट

सोंड्याटोला सिंचन प्रकल्पावर दुष्काळाचे सावट

देखभाल दुरूस्ती अडली : टाकीचा उपसा नाही, नदी पात्रात पाण्याचा ठणठणाट, नियोजन अभावी शेतकरी संकटात
रंजित चिंचखेडे चुल्हाड /सिहोरा
३५ हजार शेतकरी व त्यांचे कुटुंबियांना आधारवड असणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पावर यंदा अपुरे पाऊस आणि नियोजनअभावी दुष्काळाचे सावट आहे. यामुळे १४ हजार हेक्टर आर शेती सिंचनापासून वंचित ठेवण्याचे संकट उभे झाले आहे.
या शेतकऱ्यांना तारण्यासाठी राजीव सागर धरणाचे पाणी बावनथडी नदी पात्रात सोडण्याचे नियोजन शासन आणि प्रशासनाकडे नाही, अशी माहिती मिळाली आहे. बावनथडी नदीवर सिहोरा परिसरात सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचे उपसा करण्यात आलेले पाणी विस्तीर्ण चांदपूर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. पावसाळापुर्वी जलाशयात २० टक्के पाणी राखून ठेवण्यात येत असताना यंदा जलाशयाची जीर्ण दरवाजा दुरूस्ती करताना पाटबंधारे विभागाने मार्च महिन्यात जलाशयातील पाणी निरंक केलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पाऊस नसतानाही धानाची नर्सरी वाचविण्यासाठी पाणी मिळाले नाही. पाणी नसल्याने धानाची नर्सरी अडचणीत आली आहे. शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओठवले आहे. दरम्यान नियोजन अभावी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प संकटात अडकला आहे. या प्रकल्पाचे नियंत्रण तिरोडा येथील उपसा सिंचन प्रकल्पाच्या कार्यालयातून होत आहे. प्रकल्पाच्या टाकीतील गाळ काढण्यासाठी ई-टेंडरिंग प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. परंतु मध्यंतरी आलेल्या पावसाचे पाणी टाकीत शिरल्याने यंदा टाकीतील गाळ काढता येणार नाही. याशिवाय प्रकल्पात ९ पंपगृह आहेत. संपूर्ण पंपगृहाचा नदी पात्रातील पाण्याचा उपसा करण्यासाठी उपयोग करण्यात आलेला नाही. केवळ ४ पंपगृह सुरू केली जात आहे. परंतु या पंपगृहाची देखभाल आणि दुरूस्ती अडली आहे. निधीअभावी या प्रकल्पस्थळात ठिक ठाक नाही, अशी माहिती मिळाली आहे.
हा प्रकल्प मागील आठ वर्षापासून अनेक उतार चढाव अनुभवत आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियंत्रणात हा प्रकल्प आहे. पाणी वाटप करताना पाणीपट्टी करांची रक्कम शेतकरी लघु पाटबंधारे विभागाकडे जमा करीत आहेत. प्रकल्पाची देखभाल आणि दुरूस्ती तिरोडा उपसा सिंचन योजना यांचे नियंत्रणात होत आहे. या प्रकल्पात हस्तांतरणाचा वाद आहे.
प्रकल्पस्थळात २ आॅपरेटर व ३ सुरक्षा गार्ड आहे. ११० कोटींचा प्रकल्प अल्प सुरक्षा रक्षकांच्या नियंत्रणात आहे. प्रत्यक्षात ९ सुरक्षा गार्डाची गरज आहे. परंतु यात कात्री लावण्यात आली आहे. दरम्यान ३ सुरक्षा गार्डाचे गेल्या ४ महिन्यापासून वेतन प्राप्त झाले नाही. यंदा प्रकल्पात नियमित पाण्याचा उपसा होणार किंवा नाही हे आता सध्यातरी संशयास्पद आहे. गेल्यावर्षी १ आॅगस्टला पंपगृह सुरू करण्यात आले होते. तर ५६ दिवसनंतर २५ सप्टेंबर रोजी हा बंद करण्यात आले होते. यामुळे ३६ फुट पाण्याची साठवणूक जलाशयात झाली होती तर १० हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आली होती. परंतु यंदा तसे चित्र या प्रकल्पस्थळात नाही. ही प्रकल्पनदी पात्रातून पाण्यावा उपसा करण्यास सज्ज असून पावसाची प्रतिक्षा असल्याची माहिती प्रकल्प स्थळातील आपरेटर यांनी दिली.

Web Title: Due to the sondito irrigation project drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.