शहरं
Join us  
Trending Stories
1
६७ बिनविरोध नगरसेवक निवडणूक आयोगाच्या रडारवर; दबाव टाकला की आमिष दाखवलं? होणार चौकशी
2
सुकमामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत १२ नक्षलवादी ठार
3
आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
4
तारिक रहमान होणार 'किंग', पण प्रचाराचं काय? बांगलादेशात निवडणूक आयोगाच्या 'या' एका नियमाने वाढवलं टेन्शन!
5
Border 2: मेरा दिमाग हिला हुआ है! 'घर कब आओगे' गाण्याच्या लाँचवेळी सनी देओल असं का म्हणाला?
6
पाकिस्तानची नापाक खेळी; राजस्थानमध्ये ड्रोनने पाठवली 'पांढरी पावडर', पोलिसांनी असा लावला छडा
7
इराणमध्ये खामेनींविरोधात निदर्शने तीव्र, ट्रम्प यांच्या पाठिंब्यामुळे 'Gen-Z' चा उत्साह वाढला
8
एकच प्रीमिअम, पती-पत्नीला मिळणार विमा सुरक्षा प्लॅन; जाणून घ्या कसं?
9
महाराष्ट्राचा शाहरुख खान! पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेश कामतचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन, दाखवले सिक्स पॅक ॲब्स
10
कंडोमच्या किमती वाढल्याने लोकसंख्या वाढेल? सलग तिसऱ्या वर्षी चीनला भीती, भारतासाठी ही एक संधी
11
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामाचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
12
‘नवसाचं पोर गेलं, भरपाई दिल्याने परत येणार का?’ दूषित पाण्यामुळे मृत्यू; दोन अधिकाऱ्यांना हटवले
13
इराण पेटला...! सर्वोच्च नेते खामेनेईंविरुद्ध तरुणाईचे रस्त्यावर उतरून आंदोलन; देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर, निदर्शनात सात जणांचा मृत्यू
14
कॅनडा सोडायची वेळ आली? १० लाख भारतीयांचे 'लीगल स्टेटस' धोक्यात; जंगलात टेंट लावून राहण्याची आली वेळ!
15
कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत
16
शेणाने रंगवल्या आहेत नितीन गडकरींच्या घराच्या भिंती, फराह खानने दाखवली झलक, पाहा व्हिडीओ
17
शाहरुख खान अन् भन्साळीही वापरणार 'धुरंधर' फॉर्म्युला? 'किंग' अन् 'लव्ह अँड वॉर' दोन भागांमध्ये येणार
18
Shakambhari Purnima 2026: शाकंभरी पौर्णिमेचा 'महायोग'! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुखाचा पूर
19
बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

पालोऱ्याला तीव्र पाणीटंचाईची झळ

By admin | Updated: March 14, 2015 00:49 IST

३ हजार ५०० लोकसंख्येच्या पालोरा गावासाठी १.१० लाख लिटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना असतानाही दिड वर्षापासून नागरिकांना तीव्र ...

युवराज गोमासे करडी३ हजार ५०० लोकसंख्येच्या पालोरा गावासाठी १.१० लाख लिटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना असतानाही दिड वर्षापासून नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गुंडभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दारोदारी भटकावे लागत असून अपशब्दांचा मारा सुद्धा सहन करावा लागतो आहे. ग्राम प्रशासन पाणी पुरविण्यास अपयशी ठरले आहे.मोहाडी तालुक्यातील पालोरा २० वर्षापुर्वी पहाडी जवळील उंच भागात पाणीपुरवठा योजनेची टाकी उभारली गेली. गावाची लोकसंख्या वाढल्याने नेहमी पाण्याची समस्या भेडसायची. त्यावर उपाय म्हणून तत्कालीन ग्राम प्रशासनाने वेळेची गरज ओळखून सन २०१०-११ मध्ये वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करून कार्यान्वीत केली. आज दोन्ही योजनेची पाण्याची क्षमता १ लाख १० हजार लिटरची झाली आहे तर गावाची लोकसंख्या ३५०० च्या घरात आहे.लोकसंख्येच्या प्रमाणात योजनेची क्षमता पुरेशी आहे, असे असतानाही नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याची कारणेही नागरिकांकडून वेगवेगळी सांगितली जात आहेत. योजनेचे पाणी वितरणाचे जाळे उताराच्या दिशेने टाकण्यात आली असल्याने पाणी सरळ शेवटच्या टोकावर पोहचतो. त्यांना २४ तास पाणी मिळते तर उंचावरील नागरिकांना गुंडभर पाणीही मिळत नाही. वितरणाचे जाळे उताराच्या विरूद्ध बाजुने म्हणजे पूर्व-पश्चिम पाहिजे होते, असा तांत्रिक तर्क आहे. नागरिकांनी घरोघरी खोल खड्डे खोदून अतिरिक्त पाणी ओढणे सुरू ठेवले आहे. काहींनी नळांच्या तोट्या काढलेल्या असून टिल्लू पंपाने पाणी ओढणे सुरू ठेवले. मात्र ग्राम प्रशासनाने सुचना देण्या पलिकडे कार्यवाही केली नाही. त्यामुळे बिना दिक्कत मुठभर नागरिक पोसले जात आहेत.राजकारणापोटी कारवाई केली जात नाही. जुनी पाईप लाईन खोलवर दाबल्या गेली असून ३ ते ४ फुट मातीचे थर त्यावर तयार झाले आहेत. गावातून मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते तयार झाल्याने आज ती काढून तपासणीही करता येत नाही. जुन्या पाईप लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला जाण्याची शक्यता ग्रामप्रशासनाकडून व्यक्त होत आहे. मुख्य पाईप लाईनवरून गांधी वॉर्डातील मोजक्या नागरिकांसाठी पाईप लाईन टाकली गेल्याने उर्वरित भागाला त्याचा परिणाम भोगावा लागत असल्याचेही नागरिकांचे मत आहे.पालोरा येथील तीव्र पाणी टंचाईसाठी अनेक कारणे सांगितले जात असली तरी ४० टक्के नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित असून महिलांना गुंडभर पाण्यासाठी दारोदारी भटकावे लागते. अपशब्दांचा मार सहन करावा लागतो ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. गावातील सार्वजनिक स्टॅन्ड पोस्ट निकामी ठरली असून खाजगी कनेक्शन सुद्धा कोरडी आहेत. उन्हाळ्यापुर्वीच तीव्र पाणी टंचाई गावात पहायला मिळत आहे.