पैशाच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण
By Admin | Updated: August 3, 2014 23:10 IST2014-08-03T23:10:32+5:302014-08-03T23:10:32+5:30
मुद्देमालासहित व्याजाची रक्कम देत नाही, म्हणून भररस्त्यात मारहाण करण्यात आली. तसेच बळजबरीने उचलून नेऊन एका खोलीत चार तास डांबून ठेवून मारहाण करणाऱ्या अवैध सावकारी करणाऱ्यासह

पैशाच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण
दोघांना अटक : ४ पर्यंत पोलीस कोठडी
तुमसर : मुद्देमालासहित व्याजाची रक्कम देत नाही, म्हणून भररस्त्यात मारहाण करण्यात आली. तसेच बळजबरीने उचलून नेऊन एका खोलीत चार तास डांबून ठेवून मारहाण करणाऱ्या अवैध सावकारी करणाऱ्यासह त्याच्या मित्राला तुमसर पोलिसांनी अटक केली आहे.
दोन्ही आरोपींवर ३४२, ३६५, ५०६, ३४, २४, ३९, ४१ (क), ४५ मुंबई सावकारी कलम २०१४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. प्रेमदास उर्फ बंडू मदनलाल राऊत (४५) रा.माता वॉर्ड तुमसर व प्रमोद चक्रधर डहाट (३१) रा.आंबेडकर वॉर्ड, तुमसर असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
शैलेश गिरीधारी बिंझाडे (३०) रा.तुमसर याने अवैध सावकारी करणारा प्रेमदास राऊत याच्याकडून सन २०१३ मध्ये २ लक्ष ५० हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. त्याऐवजीू बिंझाडे यांनी राऊत यांच्याकडे आपल्या घराचे विक्रीपत्र तथा इतर दस्ताऐवज ठेवून एक करारनामा लिहून घेतला होता. प्रेमदास याला आतापर्यंत ५० हजार व्याज बिंझाडे यांनी दिले. उर्वरीत २ लक्ष शिल्लक रकमेकरिता राऊत याने बिंझाडे याला भ्रमणध्वनी केला. परंतु बिंझाडे यांनी तो उचलला नाही. ३० जुलै रोजी शैलेश बिंझाडे सनफ्लॅग कंपनीतून कामावर परत येतांनी तुमसर येथील जैन मंदिर चौकात राऊत व डहाट यांनी थांबवून मारहाण केली. बळजबरीने तहसील कार्यालय परिसरातील कार्यालयात बिंझाडेला आणले. त्यानंतर चार तास डांबून ठेवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. परिसरातील दोन ते तीन नागरिकांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. त्यानंतर बिंझाडे यांची सुटका करण्यात आली. बिंझाडे झालेल्या प्रकारामुळे भयभीत झाले होते. त्यांनी ३१ जुलै रोजी तुमसर पोलीस ठाण्यात प्रेमदास राऊत व प्रमोद डहाट यांच्याविरोधात तक्रार नोंदविली. तुमसर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची ४ आॅगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. तपास एसडीपोओ आनंद भोईटे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर गवई, हवालदार बोरकर करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)