निधीअभावी तलावांचे खोलीकरण अडले
By Admin | Updated: October 27, 2016 00:30 IST2016-10-27T00:30:10+5:302016-10-27T00:30:10+5:30
सिहोरा परिसरात असणाऱ्या जंगल शेजारी तलावाचे खोलीकरण करण्यात आले नसल्याने अल्प पाण्याी साठवणूक आहे.

निधीअभावी तलावांचे खोलीकरण अडले
चुल्हाड डोह तलावात पाणीच पाणी : रोहयो अंतर्गत खोलीकरणाची मागणी
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात असणाऱ्या जंगल शेजारी तलावाचे खोलीकरण करण्यात आले नसल्याने अल्प पाण्याी साठवणूक आहे. याशिवाय अनेक तलावात गाड व नादुरूस्त तलावाची स्थिती चिंताजनक असल्याने रोहयो अंतर्गत तलाव खोली करणाची मागणी करण्यात आली आहे.
यंदा पावसाळ्यात सिहोरा परिसरात दमदार पावसाची हजेरी दिसून आली नाही. परंतु अल्प पाऊस साठा असताना शेतकऱ्यांचे भात पिकांला तारणाऱ्या पावसाने वेळोवेळी हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर समाधानाचे चित्र असल्याचे दिसून येत आहे. परंतु अल्प पावसात ही तलावात पाणी साठवणुक करता आली नाही. तलावात गाळ व जिर्णावस्था चिंतेचा विषय ठरणारी आहे. परिसरातील चुल्हरडोह गावाच्या शेतारी तलाव असून पानीच नाही, असे चित्र आहे. या महत्वपूर्ण तलावाची अद्याप दुरूस्ती करण्यात आली नाही.
या तलावामुळे सिंचित क्षेत्र वाढण्याची शक्यता असून धनेगाव, दावेझरी, मच्छेरा गावापर्यंत शेतकरी व अन्य तलावांना संजीवनी देताना मदत होणार आहे. परंतु या तलावाचे दुरूस्ती करिता सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. वन विभागाच्या हद्दीत असणाऱ्या या तलावाचा फायदा वन्य प्राण्यांना होणार आहे.
या तलावाची कधी काळी गेटचे काम करण्यात आले आहे. काही अंतर नहराचे कामे झाली आहे. परंतु ही कामे अर्धवट ठेवण्यात आली आहे. वन कायद्यात या तलावाचा विकास खुंटला असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान निधी अभावी तलावाचे खोलीकरण अडल्याने रोहयो अंतर्गत खोलीकरण करण्याची मागणी होत आहे.
सध्या गावात रोहयो अंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करणारे नियोजन नाही. याशिवाय हे कामे करण्यासाठी जागा नाही. यामुळे मजुरांना कामे उपलब्ध करताना यंत्रनेची कसरत होत आहे. परिसरात अशा तलावाची खोली करण्याचे कामे ३ ते ४ गावातील मजुरांना एकाचवेळी उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. यामुळे तलावाची पाणी साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी मदतीचे ठरणार असून जंगलातील तलावाची दुरूस्ती करण्याची मागणी धनेगावचे सरपंच छगनराव पारधी यांनी केली आहे. (वार्ताहर)