अतिवृष्टीमुळे तुमसर-रामटेक राज्यमार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:58 IST2019-07-03T22:58:46+5:302019-07-03T22:58:59+5:30
मंगळवारी रात्रीपासून सततच्या पडत असलेल्या मुसळधार पावसाने तुमसर-रामटेक राज्य मार्गावरील काटेबाम्हणी-उसर्रा रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून सदर राज्यमार्ग बंद आहे.

अतिवृष्टीमुळे तुमसर-रामटेक राज्यमार्ग बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
उसर्रा : मंगळवारी रात्रीपासून सततच्या पडत असलेल्या मुसळधार पावसाने तुमसर-रामटेक राज्य मार्गावरील काटेबाम्हणी-उसर्रा रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून सदर राज्यमार्ग बंद आहे.
याबाबत असे की, तुमसर-रामटेक राज्यमार्ग विस्तारीकरणाचे काम जोमात सुरू आहे. सदर रस्ता सिमेंट रस्ता विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावर काटेबाम्हणी-उसर्रा रस्त्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. पुलाचे बांधकाम सुरू असताना बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांनी सदर पुलावरून बायपास रस्ता काढला. या रस्त्यावर मोठा नाला आहे. मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला असून सतत अतिवृष्टी सुरूच आहे. येथे मोठा नाला असून नाल्यात बºयाच मोठ्या प्रमाणात पाणी साठला असून रस्त्यावर वाहू लागणारे सदर रस्ता येणे जाणे बंद झाले आहे. कंत्राटदाराने वेळीच नियोजन केले असते तर कदाचित नागरिकांना संकटाला सामोर जावे लागले असते. सदर रस्ता बंद झाल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व तात्काळ उपाय योजना करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान मार्ग बंद झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली असून उपाययोजना करण्याची गरज आहे.