अतिक्रमणामुळे जंगलाचे अस्तित्व धोक्यात
By Admin | Updated: September 28, 2016 00:43 IST2016-09-28T00:43:20+5:302016-09-28T00:43:20+5:30
तालुक्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात जंगलाचे अस्तित्व असून अनेक गावे जंगलाच्या पायथ्याशी आपले ठांब मांडून आहेत.

अतिक्रमणामुळे जंगलाचे अस्तित्व धोक्यात
कायद्याचे उल्लंघन : वनसमित्या ठरताहेत कुचकामी
साकोली : तालुक्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात जंगलाचे अस्तित्व असून अनेक गावे जंगलाच्या पायथ्याशी आपले ठांब मांडून आहेत. त्या जंगलालगतच्या गावात वनहक्क समितीची स्थापना करण्यात आली व त्यांना जंगलाच्या संरक्षणाकरीता अनेक अधिकार देण्यात आले. परंतु या वनहक्क समित्या आता अनेक गावात कुचकामी ठरत असल्याचे चित्र पहावयास दिसत आहे.
जंगलावर अनेकांनी अतिक्रमण करून शेती फुलवल्याने पिके डोकायला लागल्याने जंगलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मात्र याकडे वरिष्ठांनी कानाडोळा केला सून ते आमच्या काळातील अतिक्रमणन नाही, असा निर्वाळा देत आहेत. तालुक्यातील जंगलाचे अस्तित्व घनदाट असणारे हे जंगल आता वाढत्या अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस वृक्षाची वाढती कत्तल यामुळे जंगले विरळ होत आहेत. बरीच गावे ही जंगलाच्या पायथ्याशी असून अशा गावात शसनाने जंगलाचे रक्षण होवून वृक्षाचे संवर्धन करण्याकरीता वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. मात्र या योजना राबवूनही जंगलातील वृक्षतोड थांबली नाही. उलट या बाबीत वाढ होवून अधिकारी कर्मचारी यांना आर्थिक देवानघेवान करून अनेकांनी शेकडो वृक्षाची कत्तल करून जंगलावरच शेतीची निर्मिती केली आहे. शेकडो हेक्टर जमिनीवर आज पिके डोलत आहेत.
शासन एकीकडे झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देते तर दुसरीकडे ग्रामीण भागात अस्तीत्वात असलेली जंगले हे वाढत्या शेतीच्या अतिक्रमणामुळे धोक्यात येत आहेत. दरवर्षीच या प्रकारात वाढ होत आहे. मात्र जंगल लगतच्या गावात असलेल्या वनहक्क समित्याही कुचकामी ठरत आहेत. शासनाने जंगलाचे संरक्षण व्हावे म्हणून इंधनासाठी गोरगरीब बीपीएल, अंत्योदय प्रवर्गातील कुटूंबांना गॅस दिले परंतु तेही कुचकामी ठरत आहेत. परिणामी जंगलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)