संततधार पावसामुळे नवेगाव येथे घर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:03 IST2019-07-03T23:03:11+5:302019-07-03T23:03:28+5:30
गत तीन चार दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे मोहाडी तालुक्यातील नवेगाव येथील एक घर कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र एक कुटुंब उघड्यावर आले आहे.

संततधार पावसामुळे नवेगाव येथे घर कोसळले
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गत तीन चार दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे मोहाडी तालुक्यातील नवेगाव येथील एक घर कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र एक कुटुंब उघड्यावर आले आहे.
मोहाडी तालुक्यातील नवेगाव बुज. येथे कमलाबाई सत्यवान तिबुडे यांचे घर आहे. गत तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसात रात्रीच्या वेळी त्यांच्या घराच्या भिंती अचानक कोसळल्या. त्यावेळी कमलाबाई दुसऱ्या बाजूला असल्याने मोठा अनर्थ टळला. राहते घर पडल्याने विधवा कमलाबाई उघड्यावर आल्या आहेत. आता कुठे राहावे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. कमलाबाईने ग्रामपंचायतीने घरकुल मिळावे म्हणून अर्ज केला आहे.
मदतीची अपेक्षा
कमलाबाई तिबुडे यांचे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलात नाव आहे. परंतु अद्यापही या विधवा महिलेला घरकुलाचा लाभ मिळाला नाही. आता तर त्यांचे घरच उद्धवस्त झाले. त्यांना मदतीची अपेक्षा आहे.