उपसरपंचांचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू
By Admin | Updated: July 16, 2016 00:34 IST2016-07-16T00:34:35+5:302016-07-16T00:34:35+5:30
शेतात ट्रॅक्टरनी चिखलनी करीत असतांना ट्रॅक्टर उलटल्याने बाम्पेवाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच यांचा त्यात दबून मृत्यू झाला

उपसरपंचांचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू
साकोली : शेतात ट्रॅक्टरनी चिखलनी करीत असतांना ट्रॅक्टर उलटल्याने बाम्पेवाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच यांचा त्यात दबून मृत्यू झाला. ही घटना बाम्पेवाडा शेतशिवारात आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.
भगवान शालिकराम चांदेवार (१७) रा. बाम्पेवाडा असे मृतकाचे नाव आहे. भगवान चांदेवार यांच्या शेतात रोवणी सुरु होती. या रोवणीसाठी चांदेवार हे स्वत:चा ट्रॅक्टर क्र. एम एच ३६-७१८५ ने शेतात चिखलणी करीत असतांना ट्रॅक्टर शेतातील चिखलात फसला. तो काढीत असताना ट्रॅक्टरचे संतुलन बिघडल्याने व त्यांच्या अंगावर तो उलटला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीसताफा घटनास्थळावर पोहचला.
पोलिसांनी घटनेची नोंद करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे पाठविला. (शहर/तालुका प्रतिनिधी)