औषध व्यवसाय उत्तम सेवेचे केंद्र - गहाणे
By Admin | Updated: September 24, 2015 00:42 IST2015-09-24T00:42:24+5:302015-09-24T00:42:24+5:30
औषधी व्यवसाय आरोग्याशी निगडित असून त्यांना उत्तम सेवा देण्याचे केंद्र आहे.

औषध व्यवसाय उत्तम सेवेचे केंद्र - गहाणे
भंडारा : औषधी व्यवसाय आरोग्याशी निगडित असून त्यांना उत्तम सेवा देण्याचे केंद्र आहे. हे चांगले काम या व्यवसायाच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन भंडारा - गोंदिया जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त दा.रा. गहाणे यांनी व्यक्त केले. चांदपूर येथे तुमसर तालुका औषध विक्रेत्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शेड्यूल एच वन, शेड्यूल एच, अँटीबॉयोटीक, टी.बी. या औषधावरील वेगवेगळे उदाहरण देऊन विस्तृत माहिती सांगून ड्रक अँड कॉसमेटीक अॅक्ट या कायद्याबद्दल माहिती गहाणे यांनी दिली. औषधी दुकान तपासणीच्या वेळी कोणकोणत्या बाबीची आवश्यकता आहे. यावर औषध निरीक्षक प्रशांत रामटेके यांनी प्रकाश टाकला .यावेळी सहायक आयुक्त दा.रा. गहाणे, औषध निरीक्षक प्रशांत रामटेके, नवनियुक्ती जिल्हा औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष संजय खत्री, सचिव केशर धारगावे, संघटन सचिव शिवशंकर बावनकुळे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी तुमसर तालुका प्रतिनिधी समीर तगंडपल्लीवार यांची निवड करण्यात आली. संचालन व आभार विजय कांबळे यांनी केले. यावेळी तालुक्यातील सर्व औषध विक्रेते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)