चौरास भागात कोरडवाहू शेतकरी दुष्काळाच्या छायेत
By Admin | Updated: November 24, 2014 22:53 IST2014-11-24T22:53:38+5:302014-11-24T22:53:38+5:30
मोदी सरकारने धान शेतकऱ्यांचा भ्रमनिराश केला, धान उत्पादक शेतकऱ्यांना धानासाठी २५०० रूपये प्रतिक्विंटल देण्याचे आश्वासन निवडणुकीच्या पूर्वी भाजपाने केला होता. परंतु भाव सोडा पण

चौरास भागात कोरडवाहू शेतकरी दुष्काळाच्या छायेत
कोंढा (कोसरा) : मोदी सरकारने धान शेतकऱ्यांचा भ्रमनिराश केला, धान उत्पादक शेतकऱ्यांना धानासाठी २५०० रूपये प्रतिक्विंटल देण्याचे आश्वासन निवडणुकीच्या पूर्वी भाजपाने केला होता. परंतु भाव सोडा पण अनेक भागात पाऊस न पडल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. त्यांना मदत करण्याचे सरकार विसरले असा, आरोप चौरास भागातील शेतकरी करीत आहेत.
भंडारा जिल्हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. धान उत्पादकांना दरवर्षी अनेक संकटाना तोंड द्यावे लागते आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. एका एकरला २० हजार खर्च आले पण यावर्षी कोंढा परिसरात चुऱ्हाड, सोमनाळा, पिंपळगाव, नवेगाव, सोनेगाव, विरली खं. भावड, अत्री, फनोली, आकोट या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात नापिकी झाली. पण शासनातर्फे व एकाही लोकप्रतिनिधीनी मदतीसाठी हाक दिली नाही. दरवर्षी नैसर्गीक संकटे येत आहेत.
यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. धान पेरणीला परिसरात जून महिन्यात सुरवात झाली. तेव्हा पावसाअभावी धानाचे पऱ्हे गेले. दुबार पेरणी करावी लागली. कसेतरी रोवणी शेतकऱ्यांनी केली. नंतर धान काडीवर असताना अचानक पाऊस बेपत्ता झाला. अशावेळी काहीनी इकडूनतिकडून पाणी घेऊन शेतीला पाणी दिले. परंतू पावसाअभावी मोठ्याप्रमाणात नापिकी झाली. ज्यांचे थोडेबहूत धानपिक झाले. त्यांच्या धानाला योग्य भाव मिळत नाही. (वार्ताहर)