यंदा शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट
By Admin | Updated: July 8, 2014 23:19 IST2014-07-08T23:19:16+5:302014-07-08T23:19:16+5:30
यंदा मान्सूनने दडी मारून बसल्याने पावसाचा थांगपत्ता नाही. परिणामी साकोली तालुक्यातील ५० टक्के पऱ्हे वाळले असून शेतकऱ्यावर दुबार पेरणीची पाळी असून पावसाची हीच परिस्थिती कायम राहिली

यंदा शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट
साकोली : यंदा मान्सूनने दडी मारून बसल्याने पावसाचा थांगपत्ता नाही. परिणामी साकोली तालुक्यातील ५० टक्के पऱ्हे वाळले असून शेतकऱ्यावर दुबार पेरणीची पाळी असून पावसाची हीच परिस्थिती कायम राहिली तर कृषी उत्पन्न घटन्यासोबतच पाणी आणि जनावरांचा चारा या गंभीर संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.
पावसाने हुलकावणी दिल्याने सोकली तालुक्यात शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पेरण्या व रोवण्या रखडल्या आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार साकोली उपविभागातील साकोली, लाखनी व लाखांदूर या तिनही तालुक्यात पावसाअभावी शेतीची कामे रखडली असून आतापर्यंत फक्त पेरणीची कामे उरकली असून तिन्ही तालुक्यात ९० टक्के एवढे पेरण्या झाल्या असून ज्या शेतकऱ्याजवळ पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी रोवणी केली आहे. हे प्रमाण अत्यल्प आहे. यात साकोली तालुका ९ हेक्टर, लाखनी तालुका १८ हेक्टर तर लाखांदूर तालुका ५ हेक्टर असा आहे. मागील वर्षीच्या मानाने यावर्षी जून महिन्यात पावसाचे प्रमाण नाहीच्या बरोबर आहे व जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याला पाणी नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक गणितच बिघडली. पेरणी झाल्यानंतर साधारणत: पंधरा ते वीस दिवसानंतर रोवणीची वेळ असते. रोवणी झाल्यानंतर धानाची जात पाहून त्याचे ठराविक दिवस असतात. हलका धान ११० ते १२० दिवस, मध्यम प्रतीची १३५ ते १४० दिवस, भारी प्रतीचा धान १४५ ते १५० दिवस असे असून पिक उत्पादनासाठी जून ते आॅक्टोबर हा कालावधी १५० दिवस भात शेतीसाठी अनुकुल असा समजला जातो. मात्र यावर्षी पावसाच्या प्रतिक्षेत एक महािं असाच उलटल्याने यावर्षी उशिरा पाऊस आला तरी भातपिकाच्या उत्पन्नावर नक्कीच फरक पडणार आहे. पावसाची अशीच स्थिती राहिली तर उत्पादनाबरोबर पाणी व गुरांच्या चाऱ्याचीही कमतरता भासेल. यात शंका नाही. तर यावर्षी शासनाने शेतकऱ्यांना महाबिज या बियाण्यावर मिळणारी सबसिडीही बंद केली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यावर हाही एक ओझाच चढला आहे. यावर्षी साकोली तालुक्यासाठी कृषी केंद्रात ८ हजार ६५३ क्विंटल बियाणे आले असून पैकी ४ हजार ६९९ क्विंटल विक्री झाले तर खत ५ हजार १८२ मॅट्रीक टन पुरवठा झाला. पैकी ५४९ मॅट्रीक टन विक्री झाले व उर्वरीत ४ हजार ६३३ मॅट्रीक टन खताचा साठा शिल्लक आहे. पंचायत समितीचे कृषी विभाग व उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय सज्ज असून शेतकऱ्याप्रमाणेच या विभागांनही पावसाची प्रतिक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)