दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची ग्राहक मंचाकडे धाव
By Admin | Updated: June 6, 2016 00:33 IST2016-06-06T00:33:32+5:302016-06-06T00:33:32+5:30
तुमसर तालुक्यातील १२ गावांची राज्य शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून ११ मे रोजी घोषणा केली.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची ग्राहक मंचाकडे धाव
स्थानिक लोकप्रतिनिधींचा पुढाकार : ११ मे रोजी निघाला आदेश, पीक विम्याचा ‘क्लेम’ मिळाला नाही
तुमसर : तुमसर तालुक्यातील १२ गावांची राज्य शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून ११ मे रोजी घोषणा केली. परंतु शासकीय मदत अजूनपर्यंत मिळाली नाही. शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम बँकेत भरल्या. ती रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. याविरोधात १२ गावातील शेतकरी ग्राहक मंचात तक्रार दाखल करणार आहेत.
११ मे रोजी राज्य शासनाने तुमसर तालुक्यातील चिखला, गोबरवाही, राजापूर, पवनारखारी, गणेशपूर, सोदेपूर, खंदाड, गुढरी, सीतासावंगी, धामनेवाडा, येदरबुची व सुंदरटोला ही गावे दुष्काळग्रस्त घोषित केल्याचा आदेश काढला. परंतु नेमका फायदा कोणता हे अजूनपर्यंत येथील शेतकऱ्यांना कळले नाही.
शासकीय अधिकारी परिसरात फिरकले नाही. नेमके दुष्काळग्रस्त म्हणजे काय याबाबतर अनभिज्ञता येथे दिसत आहे. १२ गावातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजना काढली होती. त्याची रक्कम बँकेत भरली.
शासनाने ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषणा केली. या गावातील शेतकऱ्यांना बँकेने पीक विम्याचे क्लेम देण्याची गरज आहे.
परंतु आतापर्यंत काहीच हलचल दिसत नाही. १२ गावातील लोकप्रतिनिधी व शेतकरी ग्राहक मंचाकडे खटला दाखल करणार आहे.
या क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या संगीता सोनवाने, संगीता मुंगसुमारे, जिल्हा परिषद सभापती शुभांगी रहांगडाले सह दिलीप सोनवाने, उमा सेनकपार, कविता बोमचेर, योगेश्वर देशमुख, कृष्णकांत बघेल, रेनू मासुलकर, वसंत बिटलाये, प्रभा उईके, शशीकला उईके, जमील शेख, इमला कठोते, वामन गाढवे, कल्पना टेकाम, इंद्रपाल शेंदरे या सरपंच व उपसरपंचांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)