चाकूच्या धाकावर वाहनचालकाला लुटले
By Admin | Updated: April 13, 2015 01:45 IST2015-04-13T01:45:22+5:302015-04-13T01:45:22+5:30
लाखनीहून बिलासपूरकडे जाणाऱ्या वाहनचाकाला तीन जणांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना काल शनिवारी रात्री

चाकूच्या धाकावर वाहनचालकाला लुटले
साकोली येथील घटना : दोघांना अटक, एक फरार
साकोली : लाखनीहून बिलासपूरकडे जाणाऱ्या वाहनचाकाला तीन जणांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना काल शनिवारी रात्री साकोली बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गावर घडली. यातील दोन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले असले तरी तिसरा आरोपी फरार आहे.
शनिवार दि. ११ रोजी नरेश शंकर शेंडे (३५) रा.पिंपळगाव हे वाहन एम.एच. ४० वाय ८६ मध्ये लाखनी येथून दुधाचे कॅन भरून साकोली मार्गे बिलासपुरला जात होते. साकोली येथे अंधाराचा फायदा घेत तीन अज्ञात आरोपींनी हिरव्या मोटारसायकलने सिनेस्टाईल पाठलाग केला. दूध वाहून नेणाऱ्या वाहनाला रस्त्यात अडविले. वाहनचालक शेंडे याला चाकुचा धाक दाखवून त्यांच्या जवळील एक हजार पाचशे रुपये रोख व मोबाईल हिसकाविले. शेंडे यांनी साकोली पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३९२, ३९४ नुसार गुन्ह्याची नोंद केली व तपास सुरु केला. रविवारी दुपारी पोलिसांना रजनीश पुरुषोत्तम पोगळे (२७) रा.सेंदुरवाफा व गोविंद किशोर सोरते (२६) रा.गोंदिया या दोघांना पकडण्यात यश आले. मात्र यापैकी एक आरोपी पोलिसांना गवसला नाही. तपास पोलीस उपनिरीक्षक खंडाते करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)