दांडेगावजवळ अपघातात दोन्ही ट्रकचे चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 21:50 IST2018-11-21T21:50:14+5:302018-11-21T21:50:29+5:30

दोन भरधाव ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील साकोली मार्गावरील दांडेगाव शिवारात मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. ट्रकच्या केबिनचा चुराडा झाल्याने चालकांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

The driver of both the trucks died in an accident near Dandagaon | दांडेगावजवळ अपघातात दोन्ही ट्रकचे चालक ठार

दांडेगावजवळ अपघातात दोन्ही ट्रकचे चालक ठार

ठळक मुद्देसमोरासमोर धडक : दोन्ही ट्रकच्या केबिनचा झाला चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : दोन भरधाव ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील साकोली मार्गावरील दांडेगाव शिवारात मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. ट्रकच्या केबिनचा चुराडा झाल्याने चालकांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
सचिन उर्फ मोंटू पुरुषोत्तम भुते (२७) रा.लाखांदूर आणि लक्ष्मणनंद पांचाम चिन्नपल्लम (४०) रा.कावेरी चेटीपट्टी (तामीळनाडू) अशी मृत चालकांची नावे आहेत. लाखांदूरवरून ट्रक (क्रमांक टीएन ५२ एच ३४९४) हा लोखंड घेऊन साकोलीकडे जात होता. तर ट्रक (क्रमांक एमएच ३६ एफ १८५१) हा धानाचे पोते घेऊन लाखांदूरकडे येत होता. साकोली लाखांदूर मार्गादरम्यान दांडेगाव परिसरात मंगळवारी रात्री दहा वाजता दोन्ही ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. त्यात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही चालकांना काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या अपघाताने तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच दिघोरीचे ठाणेदार गावंडे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: The driver of both the trucks died in an accident near Dandagaon