कोंढा येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई
By Admin | Updated: April 29, 2016 00:39 IST2016-04-29T00:39:23+5:302016-04-29T00:39:23+5:30
पवनी तालुक्यातील कोसरा, कोंढा येथे पिण्याच्या पाण्यासाठी बोंबाबोंब सुरु आहे.

कोंढा येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई
भटकंती सुरूच : पाणी पुरवठा योजनावर लाखो रुपये पाण्यात
कोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील कोसरा, कोंढा येथे पिण्याच्या पाण्यासाठी बोंबाबोंब सुरु आहे. कोसरा येथे तर अनेक वार्डात नळाला १ ते २ घगरा पाणी येत आहे. त्यामुळे ग्राम पंचायत प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.
कोंढा, कोसरा या दोन्ही गावांची लोकसंख्या १० हजारापेक्षा जास्त आहे. दोन्ही गावांना एक मुख्य विहिरीद्वारे पाणी पुरवठा होते. ती विहीर पूर्णत: आटली असल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे. कोसरा येथे जलस्वराज्य प्रकल्प राबविण्यात आले. यासाठी शासनाकडून लाखो रुपयाचा निधी देखील प्राप्त झाला होता. मागील पदाधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा करणारी विहिर, तसेच जलकुंभ यावर फक्त मोठमोठी पेंटीग करुन जलस्वराज्य प्रकल्प राबविल्याचे दाखविले आणि पाणी पुरवठा योजनेवर थातूरमातूर खर्च करुन निधी हडप केला. त्यामुळे सध्याची पाण्याची समस्या निर्माण झाली असा गावकऱ्यांचा आरोप आहे.
कोसरा येथील पाणी पुरवठा करणारे पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा विभागाने लाखो रुपयाचा निधी दिला. त्यामुळे कोसरा येथील पदाधिकारी व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराला पैसासाठी त्रास देऊन त्यांच्याकडून निधी मागितला ते देखील काम योग्य झाले नाही. कोसरा गावाला शासनाकडून नळयोजनेसाठी जो निधी येत गेला त्यामध्ये कंत्राटदार, पदाधिकारी लोकांनी आपआपला आर्थिक वाटा प्राप्त करुन गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. लाखो रुपये पाण्यासाठी मिळून देखील पिण्याचे पाणी गावकऱ्यांना मिळत नाही. कोसरा येथे वॉर्ड क्र. १ मेन रोडला लागून असलेल्या घरी नळाला अत्यल्प पाणी मिळत आहे पण ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी याकडे लक्ष दयायला तयार नाही, पदाधिकारी याकडे लक्ष दयायला तयार नाही. इतर वॉर्डात देखील नळाला अत्यल्प पाणी मिळत आहे. तरी कोसरा येथील पाणी समस्या सोडविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)