करडी परिसरातील रस्त्यांची भयावह अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 06:00 AM2019-12-08T06:00:00+5:302019-12-08T06:00:32+5:30

राज्य शासनाने रस्ते खडडेमुक्तची घोषणा केली होती, ही घोषणा हवेतच विरली. केवळ प्रसिध्दी मिळवून घेतली. रस्ते राज्य सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडीचे वतीने देव्हाडा ते साकोली मार्गावर पालोरापासून करडीपर्यंत रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले. परंतू कामे करतांना प्रमाणकांना धाब्यावर बसविण्यात आले आहे.

The dreaded conditions of the roads in the gray area | करडी परिसरातील रस्त्यांची भयावह अवस्था

करडी परिसरातील रस्त्यांची भयावह अवस्था

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, नागरिकांचा हकनाक जीव जाण्याची शक्यता, उपायोजनेची नितांत गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी परिसरातील मार्गांची भयावह दूरवस्था झालेली आहे. देव्हाडा-करडी-पालोरा, करडी-मुंढरी-खडकी सदर मार्ग मोहाडी जिल्हा परिषद व राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार क्षेत्रातील आहेत. मात्र, वारंवार मागणी करुनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे विभागाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
करडी परिसरातील बहूतेक सर्वच मार्ग खड्यांनी गजबजले आहेत. देव्हाडा ते पालोरा, खडकी- मुंढरी ते करडी, पालोरा ते खडकी- ढिवरवाडा, बोरगाव ते पालोरा, मुंढरी खुर्द पोचमार्ग, मुंढरी बुज पोचमार्ग, निलज खुर्द पोच मार्ग, निलज बुज पोचमार्ग, पालोरा ते जांभोरा, करडी ते दवडीपार या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येते. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून जीवघेणे ठरत आहेत. विद्यार्थी, शेतकरी व शेतमजूरांची या मार्गावरुन मोठी वर्दळ असते. नागरिकांची प्रकृती बिघडल्यास त्यांना औषधोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र करडी येथे या मार्गाने नेण्यात येते. मात्र, दुर्लक्षामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाही. किरकोळ अपघात होण्याची बाब तर नित्याची होवून बसली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसंबंधाने अधिकाऱ्याना अनेकदा माहिती देण्यात आलेली असतांना विभागाचे अभियंते कार्यालयात बसून दिवस काढण्यात व्यस्त असतात.
या मार्गाचे डांबरीकरण होवून बराच कालावधी लोटला आहे. त्यामुळे या मार्गावरील डांबरी उखडून खोल खड्डे पडले आहेत. दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. दुरवस्थेमुळे नागरिकांचा हकनाक जीव जाण्याची शक्यता आहे. सदर मार्गाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मौका पाहणी करुन डागडुजी व डांबरीकरण तसेच मजबुतीकरण करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

निकृष्ठ दर्जाची दुरुस्ती, खडी उखडली
गत राज्य शासनाने रस्ते खडडेमुक्तची घोषणा केली होती, ही घोषणा हवेतच विरली. केवळ प्रसिध्दी मिळवून घेतली. रस्ते राज्य सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोहाडीचे वतीने देव्हाडा ते साकोली मार्गावर पालोरापासून करडीपर्यंत रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले. परंतू कामे करतांना प्रमाणकांना धाब्यावर बसविण्यात आले आहे. गुणवत्ता तर नावालाही दिसून येत नाही. त्यामुळे खड्यातील गिट्टी बाहेर निघून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहे. डांबराचे प्रमाण नाममात्र ठेवून कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या साठगाठीने निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे. प्रकरणी चौकशीची मागणी होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

जनजागृतीचा अभाव
करडी परिसरातील सर्वच रस्त्यावरील खडी उखडली असून खोल खड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रवाशांसाठी रस्ते मृत्यूचा मार्ग ठरु पाहत आहेत. सदर मार्ग आता प्रवाशांच्या अंताची प्रतीक्षाच जणू करीत असल्याचे भासत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांची ओरड सुरु असतांनाही बांधकाम विभाग दुरुस्तीचे सौजन्य दाखवितांना दिसत नाही.

Web Title: The dreaded conditions of the roads in the gray area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.