शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी

By admin | Updated: January 15, 2017 00:35 IST

राज्यातील अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध शेतकऱ्यांचा विकास व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे.

अनुसूचित जातीचे शेतकरी होणार लाभार्थी : आमदार चरण वाघमारेभंडारा : राज्यातील अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध शेतकऱ्यांचा विकास व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. या योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत मिळेल. अशी माहिती आमदार चरण वाघमारे यांनी दिली.राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांची संख्या २०१०-११ कृषीगणनेनुसार १० लाख २९ हजार एवढी आहे. या योनजेत या प्रवर्गातील शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी अडीच लाख रूपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. विहिरीसोबतच पंपसंच, वीज जोडणी आकार व सुक्ष्म सिंचन संच यासाठी एकत्रित ३.३५ लाख किंवा ३.१० लाख इतक्या मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. जुन्या विहिरींच्या दुरूस्तीसाठी ५० हजार रूपये व त्यासोबतच पंपसंच, वीज जोडणी आकार व सुक्ष्म सिंचन संच यासाठी एकत्रित १.८५ लाख किंवा १.६० लाख इतक्या मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शेततळ्याच्या अस्तीरकरणासाठी एक लाखाच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे. अस्तरी करणासोबतच पंपसंच, वीज जोडणी आकार व सूक्ष्म सिंचन संच यासह २.३५ लाख अथवा २.१० लाख रूपये एवढ्या मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाईल.संबंधित लाभार्थ्यास महावितरण कंपनीकडून सोलर पंप मंजूर झाला असेल तर पंपसंच व वीज जोडणीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या मर्यादेत ३५ हजार रूपयांपर्यंतचा लाभार्थी हिस्सा महावितरण कंपनीकडे भरण्यात येईल. या योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणारे अनुदान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानास पुरक अनुदान देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. सूक्ष्म सिंचन या घटकाची अंमलबजावणी योग्य रितीने व्हावी, यासाठी अनुदानाचे सूत्र व कार्यप्रणाली ठरविण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात येत आहे. या उपसमितीच्या निर्णयाप्रमाणे अनुदानाची रक्कम निश्चित करण्यात येणार आहे.या योजनेंतर्गत २०१७ मध्ये जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ अखेर २५ हजार विहिरींचे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार असून त्यापैकी मार्च २०१७ अखेर १० हजार विहिरींचे उद्दिष्ट साध्य होणे अपेक्षित आहे. उर्वरित १५ हजार विहिरी एप्रिल २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहेत. (शहर प्रतिनिधी)