डॉटा आॅपरेटर अद्याप कार्यरत
By Admin | Updated: June 30, 2016 00:45 IST2016-06-30T00:45:11+5:302016-06-30T00:45:11+5:30
ग्रामपंचायतमध्ये कार्यरत डॉटा आॅपरेटरांचा प्रश्न राज्य स्तरावर निकाली काढण्यात आला नाही.

डॉटा आॅपरेटर अद्याप कार्यरत
व्यथा : थकीत वेतनासाठी वाताहत
चुल्हाड (सिहोरा) : ग्रामपंचायतमध्ये कार्यरत डॉटा आॅपरेटरांचा प्रश्न राज्य स्तरावर निकाली काढण्यात आला नाही. आशावादी असणाऱ्या आॅपरेटरांनी अद्याप ग्रामपंचायत मधील प्रशासकीय कामकाज सोडले नाही. यामुळे सिहोरा परिसरात विना पगारी, फुल्ल अधिकारी अशी अवस्था डॉटा आॅपरेटराची झाली आहे.
ग्रामपंचायतमध्ये प्रशासकीय कामकाजात पारदर्शक व माहिती संगणकीकृत ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्यात आली. ग्रामीण भागात बेरोजगारांची या कामकाजात वर्णी लागली. गावातील तरूणाची गावातच डॉटा आॅपरेटर या पदावर नियुक्ती करण्यात आली. गावातच रोजगार व सेवेत काम करण्याची संधी मिळाल्याने शहरात रोजगारांसाठी जाणारे या बेरोजगार तरूणाचे लोंढे थांबले.
डॉटा आॅपरेटरांनी ग्रामपंचायतमध्ये संपूर्ण रेकार्ड अद्यावत केले.
केंद्र व राज्य शासनाला एका क्लिकवर माहिती उपलब्ध करण्यात मदत झाली. अल्पशा मानधनावर डॉटा आॅपरेटरांनी भूमिका बजावली. संगणकीकृत दाखल्याची अट शासकीय विभागांनी लागु केली.
सिहोरा परिसरातील गावात या सेवेत नियमित घेणार असल्याचे आशेने अनेक तरूणांनी विवाहाचे बाशींग बांधले. ३१ डिसेंबर २०१५ पासून डॉटा आॅपरेटराचा करार गोठविण्यात आला आहे. त्यांचे अधिकार व न्यायासाठी भांडणे सुरू आहे. परंतु वेतन व मानधन प्राप्त होत नसताना डॉटा आॅपरेटर ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजात सहभाग घेत आहे. ग्रामपंचायती या आपरेटरांना मानधन देत नाही. कौटुंबिक जबाबदारी वाढलेली आहे.
अनेकांनी डोक्यावर हात ठेवून ग्राम पंचायतींना सोडचिठ्ठी देण्यातच धन्यता मानली आहे. अनेक डॉटा आॅपरेटरानी रोजगाराचे शोधासाठी शहरात धाव घेण्यास सुरूवात केली आहे.
जुनेच प्रशासकीय कामकाज पुन्हा ग्राम पंचायती झालेला आहे. या डॉटा आॅपरेटरांना साधा तुटपुंजा मानधन देणारी राशी राज्य शासनाच्या तिजोरीत नाही. ही बाब खटखत आहे.
केंद्र शासन इंडियाचे डंका पिटत असताना राज्यात मात्र पारंपरिक पद्धतीच्या प्रशासकीय कामकाजावर पुन्हा ग्रामपंचायतीची वाटचाल सुरू झाली आहे. सरपंच आता स्वाक्षरीचे दाखले देत आहे. रेकार्डची नोंद प्रभावित झाली आहे. कुणाचे दबाव तंत्र आता नाही.
मानधन प्राप्त होत नसल्याने डॉटा आॅपरेटर कुणाची अजीजी ऐकूण घेत नाही. ग्रामपंचातींना हायटेक करण्याचा महत्वाचा दुवा ठरणाऱ्या डॉटा आॅपरेटरांचा प्रश्न निकाली काढण्याची ओरड गावात सुरू झाली आहे. (वार्ताहर)