विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचे व्यासपीठ
By Admin | Updated: January 16, 2016 00:44 IST2016-01-16T00:44:21+5:302016-01-16T00:44:21+5:30
शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावे म्हणून स्रेहसंमेलनाचे दरवर्षी आयोजन करणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचे व्यासपीठ
स्रेहसंमेलन : गोपाल अग्रवाल यांचे प्रतिपादन
मोहाडी : शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावे म्हणून स्रेहसंमेलनाचे दरवर्षी आयोजन करणे गरजेचे आहे. स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना उजाळा मिळत असून स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांचे स्वतंत्र व्यासपीठ असल्याचे प्रतीपादन आमदार गोपाल अग्रवाल यांनी व्यक्त केले.
श्री गुरुदेव चिंतामण बिसने कन्या विद्यालय व सरस्वती महिला कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी अॅड. आनंदराव वंजारी हे होते. यावेळी नगराध्यक्ष स्वाती निमजे, माजी शिक्षक आमदार विश्वनाथ डायगव्हाणे, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार अनिल बावणकर, डॉ. प्रा. लक्ष्मण नागपुरकर, नगरपंचायत उपाध्यक्ष सुनिल निरीपुंजे, श्रीपत पाटील, आशिष पातरे, हरिराज निमकर आदी उपस्थित होते. शालेय विद्यार्थी आणि शिक्षक, शिक्षिका यांनी लिहिलेल्या भरारी या हस्तलिखिताचे विमोचन माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे यांचे हस्ते करण्यात आले. माजी आमदार अनिल बावणकर, प्रमुख वक्ते डॉ. प्राध्यापक लक्ष्मण नागपुरकर यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य विद्यार्थ्यांच्या हातात आहे. संधीचे सोने करा वेळेला महत्व द्या, असे मार्गदर्शन केले. यानिमित्य नवनिर्वाचित नगरपंचायत मोहाडीचे पदाधिकारी व एचएससी आणि एसएससी परीक्षेत व कराटे स्पर्धेत राज्य पातळीवर प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांचे हस्ते स्मृती चिन्ह देऊन सत्कार व गुणगौरव करण्यात आला.
स्नेहसंमेलन कार्यक्रमात शालेय प्रगतीचा आढावा व प्रास्ताविक मुख्याध्यापिका यशोदा येळणे यांनी केले. व्यासपिठावरील मान्यवरांचा परिचय जनार्दन नागपुरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन वर्षा भोवते, मंगला पिसे तर आभार पर्यवेक्षक नरेश ठवकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)