शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पेंशनसाठी घरेलू कामगारांनी पुकारला एल्गार

By admin | Updated: September 20, 2016 00:30 IST

मागील दोन वषार्पासुन १६१ लाभार्थ्यांचे प्रत्येक १० हजार रु़ सन्मानधन, त्यानंतर नवीन लाभार्थ्यांचे सन्मानधन, पेंशन,...

सन्मानधन द्या : कामगार आयुक्त कार्यालयासमोरच धरणेभंडारा : मागील दोन वषार्पासुन १६१ लाभार्थ्यांचे प्रत्येक १० हजार रु़ सन्मानधन, त्यानंतर नवीन लाभार्थ्यांचे सन्मानधन, पेंशन, अंत्यविधीचा लाभ, प्रसूतीलाभ, शिष्यवृत्ती, जनश्री विम्याचे लाभ देण्यात यावा या मागणीला घेऊन आज घरेली कामगार, मोलकरीण संघटनेने एल्गार पुकारला. येथील कामगार आयुक्त कार्यालयासमोरच या कामगारांनी धरणे दिले. आंदोलनाचे नेतृत्व भाकपचे नगरसेवक हिवराज उके, झुलन नंदागवळी यांनी केले.राज्यात भाजप प्रणित युतीचे नवीन सरकार सत्तेवर आल्यापासुन बरखास्त करण्यात आलेले घरेलू कामगार कल्याण मंडळ अजूनही अस्तित्वात आले नाही़ एवढेच नव्हे तत्कालीन मंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी देखील करण्यात आली नाही़ आर्थिक लाभाच्या योजना प्रलंबित आहेत़ तसेच कल्याण मंडळाचे देखिल पुनर्गठण झाले नाही़ नाममात्र ‘वनमेन’ बोडार्ची नियुक्ती करण्यात आली आहे. लाभ तात्काळ मिळावे म्हणून विकास आयुक्त (असंघटीत कामगार) महाराष्ट्र कल्याण मंडळ मुंबई तसेच सहायक कामगार आयुक्त भंडारा यांना निवेदन देण्यात आले. १९ सप्ह्म्ेंबर ला भंडारा कर्यालया समोर घरेलू कमगार मोलकरणी संघटना जिल्हा भंडारा च्या वतीने धरणे आंदोलन करण्याचे आवाहन युनियनचे अध्यक्ष हिवराज उके व सचिव झुलनबाई नंदागवळी यांनी केले होते़ त्यानुसार आज धणे देण्यात आल. यापूर्वी युनियनचे अध्यक्ष़ व सचिव यांना १५ सप्ह्म्ेंबरला दुपारी १२ वाजता चचेसाठी पाचारण केले होते़ पण शासनाकडे मात्र पाठपुरावा करण्यात आला नसल्याचे संघटनेचे म्हणने आहे. चर्चेत सुध्दा समाधान झाले नाही़ परिणामी आज संघटनेने आंदोलनाचा बडगा उभारला. भंडारा जिल्ह्यातील सर्व घरेलू कामगार मोलकरणी धरणे आंदोलनात सहभागी झाले. सहायक कामगार आयुक्त ए.एच.बेलेकर यांनी मंडपात येऊन निवेदन स्विकारले. तसेच कामगारांचे प्रश्न शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. युनियनचे शिवकुमार गणवीर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी गजानन पाचे, मोहनलाल शिंगाडे, शांताबाई कनोजे, ललीता तिजारे, अरूण राऊत, योगराज ताईतकर, मंगेश माटे, ताराचंद देशमुख, शशिकला मेश्राम यांच्यासह उपस्थित होते. (प्रतिनिधी)