पेंशनसाठी घरेलू कामगारांनी पुकारला एल्गार

By Admin | Updated: September 20, 2016 00:30 IST2016-09-20T00:30:26+5:302016-09-20T00:30:26+5:30

मागील दोन वषार्पासुन १६१ लाभार्थ्यांचे प्रत्येक १० हजार रु़ सन्मानधन, त्यानंतर नवीन लाभार्थ्यांचे सन्मानधन, पेंशन,...

Domestic workers call for El Salvador pension | पेंशनसाठी घरेलू कामगारांनी पुकारला एल्गार

पेंशनसाठी घरेलू कामगारांनी पुकारला एल्गार

सन्मानधन द्या : कामगार आयुक्त कार्यालयासमोरच धरणे
भंडारा : मागील दोन वषार्पासुन १६१ लाभार्थ्यांचे प्रत्येक १० हजार रु़ सन्मानधन, त्यानंतर नवीन लाभार्थ्यांचे सन्मानधन, पेंशन, अंत्यविधीचा लाभ, प्रसूतीलाभ, शिष्यवृत्ती, जनश्री विम्याचे लाभ देण्यात यावा या मागणीला घेऊन आज घरेली कामगार, मोलकरीण संघटनेने एल्गार पुकारला. येथील कामगार आयुक्त कार्यालयासमोरच या कामगारांनी धरणे दिले. आंदोलनाचे नेतृत्व भाकपचे नगरसेवक हिवराज उके, झुलन नंदागवळी यांनी केले.
राज्यात भाजप प्रणित युतीचे नवीन सरकार सत्तेवर आल्यापासुन बरखास्त करण्यात आलेले घरेलू कामगार कल्याण मंडळ अजूनही अस्तित्वात आले नाही़ एवढेच नव्हे तत्कालीन मंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी देखील करण्यात आली नाही़ आर्थिक लाभाच्या योजना प्रलंबित आहेत़ तसेच कल्याण मंडळाचे देखिल पुनर्गठण झाले नाही़ नाममात्र ‘वनमेन’ बोडार्ची नियुक्ती करण्यात आली आहे. लाभ तात्काळ मिळावे म्हणून विकास आयुक्त (असंघटीत कामगार) महाराष्ट्र कल्याण मंडळ मुंबई तसेच सहायक कामगार आयुक्त भंडारा यांना निवेदन देण्यात आले. १९ सप्ह्म्ेंबर ला भंडारा कर्यालया समोर घरेलू कमगार मोलकरणी संघटना जिल्हा भंडारा च्या वतीने धरणे आंदोलन करण्याचे आवाहन युनियनचे अध्यक्ष हिवराज उके व सचिव झुलनबाई नंदागवळी यांनी केले होते़ त्यानुसार आज धणे देण्यात आल. यापूर्वी युनियनचे अध्यक्ष़ व सचिव यांना १५ सप्ह्म्ेंबरला दुपारी १२ वाजता चचेसाठी पाचारण केले होते़ पण शासनाकडे मात्र पाठपुरावा करण्यात आला नसल्याचे संघटनेचे म्हणने आहे. चर्चेत सुध्दा समाधान झाले नाही़ परिणामी आज संघटनेने आंदोलनाचा बडगा उभारला. भंडारा जिल्ह्यातील सर्व घरेलू कामगार मोलकरणी धरणे आंदोलनात सहभागी झाले. सहायक कामगार आयुक्त ए.एच.बेलेकर यांनी मंडपात येऊन निवेदन स्विकारले. तसेच कामगारांचे प्रश्न शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. युनियनचे शिवकुमार गणवीर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी गजानन पाचे, मोहनलाल शिंगाडे, शांताबाई कनोजे, ललीता तिजारे, अरूण राऊत, योगराज ताईतकर, मंगेश माटे, ताराचंद देशमुख, शशिकला मेश्राम यांच्यासह उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Domestic workers call for El Salvador pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.