विकास साधण्याचा पूर्ण प्रयत्न करु
By Admin | Updated: May 17, 2014 23:32 IST2014-05-17T23:32:14+5:302014-05-17T23:32:14+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातून निर्वाचित भाजपचे खासदार नाना पटोले यांनी आज, शनिवारी लाखनी येथे जनसंपर्क कार्यालयात साकोली विधानसभा क्षेत्रातील

विकास साधण्याचा पूर्ण प्रयत्न करु
लाखनी : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातून निर्वाचित भाजपचे खासदार नाना पटोले यांनी आज, शनिवारी लाखनी येथे जनसंपर्क कार्यालयात साकोली विधानसभा क्षेत्रातील मतदारांचे आभार व्यक्त करताना सर्वांना सोबत घेऊन विकास साधण्याचा पूर्ण प्रयत्न करु, असे ठोस आश्वासन दिले. लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त झाल्यानंतर प्रथमच मतदारांचे आभार मानण्यासाठी नाना पटोले लाखनी येथे आज आले असता कार्यकर्ता व जनतेने गुलाल व फटाक्याच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यकारी सदस्य डॉ. श्याम झिंगरे यांनी सर्वांना संबोधित केले. खा.नाना पटोले यांनी दिल्लीत शपथ ग्रहणानंतर सर्वप्रथम चौपदरीकरणातील त्रुटी, उड्डानपुलासाठी प्रयत्न करु व त्रुटीची पूर्तता होईपर्यंत टोलवसुली बंद करण्यासाठी सरकारकडे शिफारस करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. चौदरीकरणामुळे अनेक निरपराध लोकांचे जीव गेले. त्यामुळे उड्डाणपुलाची मागणी आपण पुढे रेटणार आहोत. पोलिसांचे संरक्षण मला नको. जनता माझ्या पाठिशी आहे. पोलिस विभागाने जनतेच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याचे आव्हान केले.भविष्यात विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला पक्षासोबत जोडावे. सर्वधर्मियांना सोबत घेऊन त्यांचा विकास साधण्याचा पूर्ण प्रयत्न करू. यावेळी भाजपाचे शिवराम गिºहेपुंजे, म.वा.बोळणे, पद्माकर बावणकर, घनश्याम खेडीकर, वाल्मीक लांजेवार, राजेश निंबेकर, शालीकराम बागडे, कापगते, किशोर साखरे, रमेश खेडकर, निरज मेश्राम, सुर्यभभान सिंगनजुडे, बागडे, वसंत कुंभारे, ज्योती निखाडे, रसिका कांबळे, सुुषमा कापगते, पुष्पा गिºहेपुंजे, पडोळे, सत्यवान वंजारी, सुधीर गिºहेपुंजे, गायधनी, गिºहेपुंजे, महेश आकरे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)