‘प्राजक्ता’ला देवदूत तारणार काय?

By Admin | Updated: September 7, 2016 00:29 IST2016-09-07T00:29:57+5:302016-09-07T00:29:57+5:30

घरात अठरा विश्व दारीद्र्य. अशात इयत्ता चवथीत असताना तिला ‘पॅपीलोमा’ या श्वास नलिकेशी संबंधित दुर्धर आजाराने ग्रासले. मागील आठ वर्षांपासुन तिचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे.

Do you save an angel to 'Prajakta'? | ‘प्राजक्ता’ला देवदूत तारणार काय?

‘प्राजक्ता’ला देवदूत तारणार काय?

घेतेय गळ्यातून श्वास : संघर्ष जीवन-मरणाचा, मदतीची प्रतीक्षा
वरठी : घरात अठरा विश्व दारीद्र्य. अशात इयत्ता चवथीत असताना तिला ‘पॅपीलोमा’ या श्वास नलिकेशी संबंधित दुर्धर आजाराने ग्रासले. मागील आठ वर्षांपासुन तिचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे. ही चित्रपटाची कहाणी नव्हे तर एका मुलीच्या जीवन - मरणाचा प्रश्न बनला आहे. प्राजक्ता खांडेकर रा. वरठी असे या मुलीचे नाव आहे. जगण्याची इच्छा असतानाही दुर्दम्य आजाराने आपल्याला मरण येणार काय? हा प्रश्न तिच्या डोळयात आग म्हणून पेटत आहे. आर्थिक अडचणीतून तारूण जीवनाची उमेद दाखविणाऱ्या दानशुर देवदुतांची तीला प्रतीक्षा आहे.
संघर्ष काय असतो, ही बाब प्राजक्ताला बघितल्यावर कळते. ती १७ वर्षाची असुन बारावीत आहे. शालेय शिक्षण पुर्ण करून हलाखीच्या परिस्थितीतही मृत्युशी झुंज देत आहे. होते नव्हते सर्व पैसे, व पर्याय संपले. मुलीला जगवायचे कसे, हा प्रश्न तिच्या कुंटुंबियांसमोर उभा आहे. प्राजक्ता ही सध्या वरठी येथे आपल्या आजीकडे राहते. चौथ्या वर्गात असताना तिला ‘पॅपीलोमा’ नामक श्वास नलीकेच्या आजाराचे लक्षण आढळखाद्व हा एकप्रकारचा कॅन्सरचा भाग; पण बरा होवु शकतो. ती पुन्हा सामान्य जीवन जगु शकते. आई,आजी, मामा तिला वाचवण्यासाठी दवाखान्याच्या चकरा मारीत आहेत. ती सध्या सम्राट अशोक विद्यालय निहारवाणी येथे शिकत होती. आजारामुळे तिला समाजाकडून दुय्यम वागणुक मिळत असल्याने ती खचली. पण आजाराबरोबर लढण्याची तीने हिंमत सोडलेली नाही. २१ मार्च २०१२ पासुन ते ८ जून २०१६ पर्यत नागपुर येथील इंदीरा गांधी शासकीय मेडीकल कॉलेज येथे तिच्यावर सात वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. अखेर त्यानी तीला उपचाराकरीता मुंबईला पाठवले. दोन दिवसांपुर्वी मुंबई येथुन शस्त्रक्रिया करून ती परतली. उपचार आणि शस्त्रक्रियेकरीता दोन ते तीन लक्ष रुपयांची गरज आहे. शस्त्रक्रिया झाल्यापासुन प्राजक्ता ही गळ्यातून टाकलेल्या नळीव्दारे श्वास घेत आहे. शाळेकडून आणि परीचित, आ. चरण वाघमारे यांनीही मदत केली होती. शासनस्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी उपलब्ध झाल्यास प्राजक्ताचा लढा यशस्वी होवू शकतो. दानशुरांची गरज आहे. (वार्ताहर)

पोलीस सहायता निधीची अपेक्षा
प्राजक्ता ची आजी देवागना शेंडे या सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहे. ती सध्या प्राजक्ता, तिची आई व लहान बहीणीचा सांभाळत असुन त्यांना एक मुलगा आहे. प्राजक्ता च्या उपचाराकरीता वारंवार दवाखाण्यात जावे लागत असल्यामुळे त्याचे काम सुटले. कुंटबाच्या पालनपोषणासह नातनीच्या उपचाराची जबाबदारी पेलवणे शक्य नाही. पोलीस विभागामार्फत असलेल्या कल्याण निधीतुन मदत मिळण्यासाठीही पायपीट सुरु आहे.

Web Title: Do you save an angel to 'Prajakta'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.