चोरी गेलेल्या घरकुलाचा छडा लागणार काय?
By Admin | Updated: November 2, 2014 22:29 IST2014-11-02T22:29:47+5:302014-11-02T22:29:47+5:30
लाखांदूर सन २००३-०४ मध्ये इंदिरा आवास योजनेच्या व्याजाच्या रकमेतून तालुक्यात मंजूर झालेले १२ घरकुल प्रस्तावित लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याचे दाखविण्यात आले.

चोरी गेलेल्या घरकुलाचा छडा लागणार काय?
लाखांदूर : लाखांदूर सन २००३-०४ मध्ये इंदिरा आवास योजनेच्या व्याजाच्या रकमेतून तालुक्यात मंजूर झालेले १२ घरकुल प्रस्तावित लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याचे दाखविण्यात आले. मात्र एकालाही काम देण्यात आला नव्हता. गेल्यावर्षी कुडेगाव येथील एका लाभार्थ्याच्या झोपडीत भेट देवून त्या चोरी गेलेल्या घरकुलाचा छडा लावण्याचे आश्वासन देणारे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय देतील का? म्हणून लाभार्थ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
तालुक्यातील लाखांदूर, पिंपळगाव को. सरांडी बु. व भागडी येथील जिल्हा परिषद क्षेत्रातून १२ नावे घरकुलासाठी तर ६ नावे घर दुरुस्तीसाठी प्रस्तावित करण्यात आली होती. सदर प्रस्ताव भंडारा जि.प. च्या प्रकल्प संचालकांकडे मंजुरीसाठी सन २००३-०४ ला पाठविण्यात आला होता. या प्रस्तावानुसार प्रस्तावित लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. मात्र यापैकी एकालाही लाभ देण्यात आला नाही. मात्र चौकशी केली असता संबंधित लाभार्थ्यांचे दस्तऐवज पंचायत समिती कार्यालयातून गहाळ झाल्याचे चौकशीअंती उघड झाले होते. पं. समितीच्या शाखा अभियंत्यांनीच तशी कबुलीही दिली होती. अशा प्रकारे विहिर चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. मागील वर्षी लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नुकसान भागाची पाहणी करण्याकरिता भाजपाचे तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष, विनोद तावडे तेव्हाचे आमदार नाना पटोले, राजकुमार बडोले, अॅड.वसंता एंचिलवार यांनी संपूर्ण चौरास भागाची पाहणी केली.
या दरम्यान कुडेगाव येथील पिसाराम नारायण बावनकुडे यांचे घरकुल चोरीला गेले म्हणून माहिती जाणून घेण्यासाठी सर्वांनी पिसारामच्या झोपडीला भेट दिली. यावेळी पिसारामने घरकुल चोरीला गेल्याची व्यथा त्यांचे समक्ष मांडली. यावेळी विधीमंडळात हा प्रश्न उपस्थित करून न्याय मिळवून देण्याची हमी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विरोधात आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरून गरीबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याने त्यावेळी आश्वासन त्यांन दिले होते.
मात्र तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष व आजचे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्याने कुडेगाव येथील पिसाराम बावनकुळे यांच्या आशा पल्लवीत झाल्या. देवेंद्र फडणवीस जरी एका खेड्यातील गरीबाचा प्रश्न सहजपणे विसरले असतील.
मात्र त्याच्या झोपडीला फडणवीसांनी भेट आज त्यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी यशाची पायरी बनली म्हणून पिसाराम मनातून आनंदात आहे. आपले गाऱ्हाणे थेट ऐवून घेणारा माणूस आज मुख्यमंत्री झाल्याने आज ना उद्या घरकुल मिळणार म्हणून जाम खुश आहे. (तालुका प्रतिनिधी)