राजेंद्र भारूड यांचे स्थानांतरण करू नका
By Admin | Updated: February 28, 2016 00:55 IST2016-02-28T00:55:36+5:302016-02-28T00:55:36+5:30
नांदेड येथील सहायक जिल्हाधिकारी कर्तव्यात दक्ष असून त्यांना फसविण्याचा कट रचला जात आहे.

राजेंद्र भारूड यांचे स्थानांतरण करू नका
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : विविध संघटनांची मागणी
भंडारा : नांदेड येथील सहायक जिल्हाधिकारी कर्तव्यात दक्ष असून त्यांना फसविण्याचा कट रचला जात आहे. त्यांचे स्थानांतरण करण्यात येवू नये, अशी मागणी आॅल इंडिया एम्लॉईज फेडरेशन तालुका शाखा भंडारा पदविधर अंशकालीन कर्मचारी संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
एम्लॉईज फेडरेशन संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात डॉ. राजेंद्र भारूड यांनी अनुसूचित जमाती जात पळताळणी समिती औरंगाबाद यांच्या मदतीने बोगस नागरिकांचे बनावट प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देणारे रॅकेट खणून काढले आहे. अशांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले आहे. खऱ्या आदिवासींना न्याय मिळत आहे. डॉ. भारूड यांच्यावर कारवाही ही बोगस आदिवासींना जाचक वाटत आहे. या कारवाईचा बदला घेण्यासाठी मोर्चे निवेदन आणि धरणेच्या माध्यमातून शासनाची दिशाभूल होत आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता डॉ. भारूड यांची बदली करू नये, अशी मागणी चित्तरंजन धुर्वे, गोवर्धन कुंभरे, के.एम. आडे, तेजराम धुर्वे, कैलास परतेकी, केशव घरत, एन.जे. उईके आदींनी केले आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनानुसार, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना धोरणात्मक निर्णय किंवा सातारा जिल्हाधिकारी यांनी केलेल्या प्रक्रियेनुसार थेट व विना अट शासकीय सेवेत समाविष्ट करावे प्रशासनाने लवकरात लवकर फाईल पाठवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिष्टमंडळात सुनिल हिरणवार, संजय बंगाले, मनोज हिरणवार, भाष्कर त्रिवेदी, पंकज पटेल, गोपाल पटेल, मनोज बानिया, रंजित सोमकुंवर, राजकुमार फुलझेले, योगेंद्र मिश्रा, सुजित चव्हाण, धर्मराज मेश्राम, सुनिल शेंडे, छाया देशकर, केशव मेश्राम, मनोज राऊत आदींचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)