वीरपुत्रांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका
By Admin | Updated: November 26, 2014 23:00 IST2014-11-26T23:00:29+5:302014-11-26T23:00:29+5:30
देशाच्या संरक्षणासाठी शहिद झालेल्या या वीरपुत्रांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, समाजात आपुलकी, प्रेमाने जगा, आशावादी बना असे आवाहन करुन जिल्ह्यात पालांदूर हे एकमेव गाव आहे

वीरपुत्रांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका
पालांदुरात शहिदांना आदरांजली : सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद पटोले यांचे आवाहन
पालांदूर : देशाच्या संरक्षणासाठी शहिद झालेल्या या वीरपुत्रांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, समाजात आपुलकी, प्रेमाने जगा, आशावादी बना असे आवाहन करुन जिल्ह्यात पालांदूर हे एकमेव गाव आहे की जिथे शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हा सोहळा बघितल्यावर ऊर भरून येते. तुम्ही पालांदूरवासीय देशभक्त आहात, असे प्रतिपादन सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद पटोले यांनी केले.
राज्याची राजधानी मुंबईवरील २६/११ च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीरपुत्रांना पालांदूर येथील बाजार चौकात आयोजित कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ते बोलत होते. पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल त्रिवेदी, पोलीस उपअधीक्षक (गृह) धरमशी, साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमतराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते दामाजी खंडाईत, इंद्रिस लध्दानी, सरपंच शुभांगी मदनकर उपस्थित होते.
प्रास्ताविकात आयोजक तथा जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत म्हणाले, राजकारणात राहून समाजसेवा घडावी. हुताम्यांचे स्मरण करावे, देश प्रेमाची जाणीव निर्माण व्हावी आणि गावाची आदर्शकडे वाटचाल व्हावी या उदात्त हेतूने शहीद श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.
प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबांच्या प्रतिमेला माल्यार्पण व हुतात्मांच्या स्मृतींस्थळावर पुष्पगुच्छ पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. पोलीस विभागातर्फे शहिदांना मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीत व भक्तीगीत गाण्यात आले. सुदाम खंडाईत यांनी ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणा दिल्या.
यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक हिरामण खंडाईत, शामराव खंडाईत, शंकरराव झलके, बाळा मोटघरे, आसाराम पंचभाई, भाऊराव भेंडारकर, अर्जून शेंडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पालांदूर ग्रामीण रुग्णालयातर्फे रक्तदान शिबिर, मधुमेह, रक्तदाब तपासणी घेण्यात आली. यावेळी ५४ दात्यांनी रक्त्दान केले. यात महिलांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जोपासली. याकरीता डॉ. पालांदूरकर, डॉ. छगन राखडे, डॉ. स्वप्नील आहारकर, डॉ. परवीन पठाण, विद्या ठाकरे, अर्चना अतकरी, घनश्याम टेंभुर्णे आदींनी सहकार्य केले. गावातील सर्व शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तथा जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामस्थ उपस्थित होते. संचालन प्रा. संजय निंबेकर यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत यांनी केले.
या कार्यक्रमाला वैशाली खंडाईत, तुळशीराम भुसारी, प्रतिभा सेलोकर, पंचायत समिती सदस्य धनंजय घाटबांधे, लिलाधर चेटूले, कृष्णा जांभूळकर, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विजय कापसे, हरिदास बडोले, कृष्णा धकाते, नारायण कडूकार, का.ना. निखाडे, ता.प. रणदिवे, गजानन शिवणकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली. (वार्ताहर)