गाडीने होऊ नये, जीवनाची बिघाडी.!

By Admin | Updated: June 8, 2014 23:41 IST2014-06-08T23:41:40+5:302014-06-08T23:41:40+5:30

भाजपचे नेते तथा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत अपघाती निधन झाले. मुंडे यांनी सीट बेल्ट लावला असता तर कदाचित माझा मित्र वाचू शकला असता,

Do not get in the car; | गाडीने होऊ नये, जीवनाची बिघाडी.!

गाडीने होऊ नये, जीवनाची बिघाडी.!

नेत्यांनी ठेवावे भान : नियमांचे पालन करणे गरजेचे, चालकांच्याही समस्या जाणून घेण्याची गरज
भंडारा : भाजपचे नेते तथा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत अपघाती निधन झाले. मुंडे यांनी सीट बेल्ट लावला असता तर कदाचित माझा मित्र वाचू शकला असता, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी व्यक्त केली. त्या पार्श्‍वभूमीवर सीट बेल्टसह इतर सुरक्षा व्यवस्थेचा किती काळजीपूर्वक वापर होतो, नेत्यांच्या वाहनचालकांना त्यासंबंधीचे कितपत भान असते, ईथपासून ते नेतेही त्याबाबत किती बेफिकीर असतात यावर प्रकाशझोत.. त्यांच्या जीविताची सर्वांनाच काळजी वाटते म्हणून..!
नेत्यांना काही सूचना.
नेत्यांनी कार्यक्रमासाठी दिलेल्या वेळा पाळल्यास विलंब टाळता येऊ शकतो.
कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कार्यक्रमांची संख्या वाढविली की पळापळ होते.
आपला चालक वेळेत जेवन केला का, त्याला विश्रांतीची गरज आहे का, हे पाहण्याची जबाबदारी नेत्यांचीच असते.
कायम एकच ड्रायव्हर घेण्यापेक्षा त्यांच्या आळीपाळीने ड्यूटी लावल्यास जास्त योग्य.
आपण नेते आहोत म्हणून नियम मोडण्यात आपणच पुढाकार घेतो. ते टाळल्यास दुर्घटना टाळली जाऊ शकते.
रोज आपण किती प्रवास करायचा याचेही बंधन घालून घ्यायला हवे.
ही काळजी घ्या
वेगाचे भान राखा. कायद्याने मोटारगाडीवर वेगाचे बंधन असले तरी सुरक्षिततेसाठी वेग र्मयादित ठेवा.
गाडीत मागे व पुढे बसणार्‍या सर्वांनी सीट बेल्ट बांधावेत.
चालकांनी दररोज गाडीच्या इंजिनची पाहणी करावी. थोडासाही संशय आल्यास दुर्लक्ष न करता मेकॅनिकला तात्काळ दाखवावे.
वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये.
गाडीतील हवा व ब्रेक सिस्टीमची नियमित तपासणी करावी.
महत्त्वाच्या लोकांच्या ताफ्यातील गाड्यांकडे विशेषत: लहान मुले कुतुहलाने पाहतात. कोणी आडवे येत नाही ना, याची दक्षता घ्या.
 

Web Title: Do not get in the car;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.