शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

कर्जबाजारी होऊन देववारी करु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 6:00 AM

भंडारा तालुक्यातील परसोडी येथील मराठा योध्दा गु्रपद्वारे सार्वजनिक शिवजयंती सोहळानिमित्त आयोजित समाजप्रबोधनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भोजराज वैरागडे, सोनी खन्ना, ओमप्रकाश गेडाम, दर्शन फंदे, अ‍ॅड. किशोर लांजेवार, सरपंच कल्पना मोटघरे, बालु ठवकर, उपसरपंच ज्ञानेश्वर हटवार, रंजीत सिंग आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देसत्यपाल महाराज : परसोडी येथील सार्वजनिक शिवजयंती सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : देव देवात नसून माणसात देव पहा. मुलांना उत्तम शिक्षण द्या, बुवा-भटजी- महाराजाच्या नादी संसार विस्कळीत करु नका. देवाची आरतीपेक्षा मुलांचा रोज अभ्यास करवून घ्या. महाराजाच्या पाया पडण्यापेक्षा आई-वडीलांची सेवा करा, परिणामी देव प्राप्तीसाठी कर्जबाजारी होऊन देववारी करु नका, असे प्रतिपादन सप्तखंजेरीवादक कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी केले.भंडारा तालुक्यातील परसोडी येथील मराठा योध्दा गु्रपद्वारे सार्वजनिक शिवजयंती सोहळानिमित्त आयोजित समाजप्रबोधनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भोजराज वैरागडे, सोनी खन्ना, ओमप्रकाश गेडाम, दर्शन फंदे, अ‍ॅड. किशोर लांजेवार, सरपंच कल्पना मोटघरे, बालु ठवकर, उपसरपंच ज्ञानेश्वर हटवार, रंजीत सिंग आदी उपस्थित होते.मनोरंजनातून समाजप्रबोधन लहान मुलांना प्रश्न विचारीत सत्यपाल महाराजद्वारे पुस्तक भेट देण्यात येत होते. तसेच वयोवृध्द मातांना सैनिकांच्या मातेला साडी-लुगडी, शाल देऊन सत्यपाल महाराज, दान करीत होते.कीर्तनात सत्यपाल महाराज म्हणाले, व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रथम तरुण मुलांमध्ये व्यसनाच्या दुष्परिणामाबाबत जागृती होणे गरजेचे, दारु सेवनाने सुखी संसाराची राखरांगोळी होते. महानत्यागी बाबा जुमदेव यांचे विचार आत्मसात करा. फुले- शाहू आंबेडकर यांच्या शिक्षण विषयक विचार मुलांमध्ये रुजवा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतर धर्मीयाप्रंती अर्थात मुस्लीम महिला विषयी आदरभावप्रमाणे जातीय सलोखा गावागावात निर्माण करा, महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचार विषयी सावित्री भीमाई, रमाई, जिजाऊ यांचे विचाराची आज गरज आहे.तत्पूर्वी सकाळी ग्राम स्वच्छता राबवण्यिात आले. शिवजयंतीनिमित्त गावातुन शोभायात्रा काढण्यात आली. संचालन घनश्याम वंजारी यांनी केले. आभार मोरेश्वर समरीत यांनी मानले. कार्यक्रमासाठी हरिश हटवार, किशोर बावनकुळे, मंथन हटवार, राहुल येळणे, कमलेश चकोले, अतुल चोपकर, कुंदन कुंडले, बादल साठवणे, अनमोल गुरनुले यांनी सहकार्य केले.