कायद्याचा दुरुपयोग करु नका

By Admin | Updated: June 25, 2014 23:37 IST2014-06-25T23:37:10+5:302014-06-25T23:37:10+5:30

कायदे हे जनतेच्या हितासाठी असून त्याचा उपयोग जनतेच्या जनकल्याणासाठी व्हावा, इतरांना त्याचा त्रास होणार नाही यासंबंधी दक्षता घेणे आवश्यक आहे, असे विचार न्यायमूर्ती पी.बी. वराडे यांनी

Do not abuse the law | कायद्याचा दुरुपयोग करु नका

कायद्याचा दुरुपयोग करु नका

विधी सेवा समितीचे आयोजन : पी.बी. वराडे यांचे प्रतिपादन
पवनी : कायदे हे जनतेच्या हितासाठी असून त्याचा उपयोग जनतेच्या जनकल्याणासाठी व्हावा, इतरांना त्याचा त्रास होणार नाही यासंबंधी दक्षता घेणे आवश्यक आहे, असे विचार न्यायमूर्ती पी.बी. वराडे यांनी न्यायमंदिर पवनी येथे आयोजित विधी सेवा समिती व वकील संघ पवनीद्वारा आयोजित मार्गदर्शन शिबिरात व्यक्त केले.
न्यायमूर्ती वराडे पुढे म्हणाले की, राज्यघटना ही मार्गदर्शक असून तिचा सम्मान व्हावा, आबालवृद्ध, महिला, बालमजूर यांच्या संरक्षणार्थ कायद्याची भूमिका महत्वपूर्ण आहे. शिक्षणाच्या कायद्याचा सदूपयोग झाला पाहिजे. महिलांना योग्य न्याय मिळाला पाहिजे यावर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती वराडे बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भागवत आकरे, सेंट्रल बँकेचे मॅनेजर फडके होते. कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. कायद्याचा नेहमी सन्मान करावा तसेच कोर्टाची पायरी आपण चढणार नाही अशी दक्षता जनतेने घेतल्यास अनेक वादविवाद मार्गी लागू शकतात, असे विचार डॉ. भागवत आकरे यांनी व्यात केले.
आपसी मित्रत्वाच्या, भाऊबंदकीच्या नात्यातून व प्रेमळ स्वभावातून विचारांच्या आदानप्रदानामुळे अनेक समस्या सुटू शकतात. त्याकरीता कोर्टात जाण्याची देखील आवश्यकता भासणार नाही असे विचार सेंट्रल बँकेचे मॅनेजर फडके यांनी व्यक्त केले.
संचालन व आभारप्रदर्शन अ‍ॅड. देवीदास तुळसकर यांनी केले. यावेळी लोकअदालतचे आयोजनदेखील करण्यात आले. न्यायमूर्ती पी.बी. वराडे, अ‍ॅड. देवीदास तुळसकर, सामाजिक कार्यकर्ता डॉ. भागवत आकरे यांनी पॅनलचे कामकाज पाहिले. ४९ पैैकी १२ खटल्यांचा निपटारा यावेळी करण्यात आला. दिवानी व फौजदारी कोर्टाचे लिपिक किरण मेश्राम, कडव, उके, बन्सोड, इंगोले यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Do not abuse the law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.