क्रीडा क्षेत्राकरिता आवश्यक सर्वतोपरी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:45 IST2018-10-30T22:45:25+5:302018-10-30T22:45:44+5:30
शैक्षणिक, सामाजिक विकासाबरोबरच शारीरिक विकास अत्यंत आवश्यक आहे. क्रीडापटूंना त्यांची सुप्त गुणांना वाव मिळण्याकरिता भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्राकरिता आवश्यक सर्वतोपरी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.

क्रीडा क्षेत्राकरिता आवश्यक सर्वतोपरी प्रयत्न करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शैक्षणिक, सामाजिक विकासाबरोबरच शारीरिक विकास अत्यंत आवश्यक आहे. क्रीडापटूंना त्यांची सुप्त गुणांना वाव मिळण्याकरिता भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्राकरिता आवश्यक सर्वतोपरी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.
भारतरत्न अटलबिहरी वाजपेयी क्रीडा संकुलाचे लोकार्पणप्रसंगी तुमसर येथे ते बोलत होते. लोकार्पणप्रसंगी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, आमदार परिणय फुके, कृउबास सभापती भाऊराव तुमसरे, सभापती रोशना नारनवरे, राजेश पटले, पल्लवी कटरे, अनील जिभकाटे, मेहताबसिंग ठाकुर, गीता कोंडेवार, मुन्ना पुंडे, राणी ढेंगे, ललीत शुक्ला, पंकज बालपांडे, राजाभाऊ लांजेवार व नगरसेवक उपस्थित होते. क्रीडा संकुलाचे बांधकामाकरिता शासनाकडून एक कोटीचे प्रस्तावास मान्यता मिळाल्याने, क्रीडासंकुलाचे बांधकाम तात्काळ करून हा परिसर खेळाडू क्रीडाप्रेमींना उपलब्ध करण्याचा सातत्याने पाठपुराव्यामुळे उपलब्ध करून देण्यात आला व यास भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी तालुका क्रीडा संकुलाचे लोकार्पण तारिक कुरैशी सभापती म्हाडा नागपूर विभाग यांचे अध्यक्षतेखाली आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदार चरण वाघमारे यांनी आपले मार्गदर्शनातून या क्रीडा संकुलाचे बांधकाम करताना अनेक अडचणी आल्या व त्यामुळे या इमारतींचे बांधकाम करण्यास विलंब जरी झाले असेल तरी मात्र यात सातत्याने प्रयत्न झाले आहे. संकुलाचा तुमसर शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.