‘जलयुक्त शिवार’ची कामे वेळेत करा
By Admin | Updated: October 15, 2016 00:34 IST2016-10-15T00:34:50+5:302016-10-15T00:34:50+5:30
पावसामुळे जिल्हयात झालेल्या धान पिकाच्या नुकसानीचे कृषि विभागाने सर्वेक्षण करुन अहवाल सादर करावा, ...

‘जलयुक्त शिवार’ची कामे वेळेत करा
जिल्हाधिकारी : पिकाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश
भंडारा : पावसामुळे जिल्हयात झालेल्या धान पिकाच्या नुकसानीचे कृषि विभागाने सर्वेक्षण करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जलयुक्त शिवारची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. अहिरे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जगन्नाथ भोर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नलिनी भोयर, उपसंचालक माधुरी सोनोने उपस्थित होते.
पिक नुकसानीचे सर्वेक्षण करतेवेळी किती क्षेत्र आहे, उत्पादकतेवर काय परिणाम झाला व किती नुकसान झाले याबाबींचा यात समावेश असावा, असे त्यांनी सांगितले. या बैठकीत जलयुक्त शिवारच्या २०१५-१६ च्या कामाचा आढावा घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर दर पंधरा दिवसांनी प्रलंबित कामाचा कामनिहाय आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रलंबित कामे डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात यावे असे सागून ज्या यंत्रणेची कामे पूर्ण होणार नाहीत त्या यंत्रणेवर जबाबदारी निश्चित केली जाईल. कंत्राटदारामुळे कामे प्रलंबित असल्यास त्यांची बैठक घेवून काम करण्यास प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी सांगितले. २०१६-१७ च्या कामाचा आढावा घेतांना आराखडयानुसार कामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुढील बैठकीत सुधारित आराखडयाचे सादरीकरण करण्याचे निर्देश त्यांनी उपविभागीय अधिका?्यांना दिले. जलयुक्त शिवार योजनेच्या कामाच्या प्रशासकीय मान्यतेची प्रत तालुका समिती अध्यक्ष व सदस्यांना देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीत जलयुक्त शिवारचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. (नगर प्रतिनिधी)