दिव्यांग धडकले जिल्हा कचेरीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 22:09 IST2018-12-29T22:09:21+5:302018-12-29T22:09:45+5:30
आपल्या हक्काच्या विविध मागण्या घेऊन शेकडो दिव्यांग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. एकलव्य सेनेच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

दिव्यांग धडकले जिल्हा कचेरीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आपल्या हक्काच्या विविध मागण्या घेऊन शेकडो दिव्यांग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. एकलव्य सेनेच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
शहरातील शिवाजी क्रीडा मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात जवळपास ४०० दिव्यांग सहभागी झाले होते. अनेक जण तीनचाकी सायकल, कुबड्या घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. एकलव्य सेनेचे अध्यक्ष संजय केवट यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चाला प्रा.के.एन. नान्हे, संदीप मारबते, ताई देशमुख, अनिल कहालकर, अशोक चौधरी, शिवदास वाहणे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर दिव्यांगांचा शासकीय नोकरीतील अनुशेष तात्काळ दूर करावा, वयाची ४५ वी पार करणाऱ्या दिव्यांगांना प्रतीमाह सात हजार रुपये मानधन द्यावे यासह विविध मागण्यांचा समावेश होता. यशस्वीतेसाठी पिंटू पटले, राजू नेवारे, गिरीधारी मेहर, निलेश मदनकर, चंद्रशेखर द्रुगकर, रोशन वंजारी, रंजना वैद्य, दिपाली वनवे, एकलव्य सेनेचे प्रवीण मडामे, दिपक मारबते, रवी उके यांनी परिश्रम घेतले.