पोलीस वसाहतीत ‘दिव्याखाली अंधार’

By Admin | Updated: January 23, 2015 01:09 IST2015-01-23T01:09:43+5:302015-01-23T01:09:43+5:30

जिल्हा मुख्यालयी असलेल्या पोलीस वसाहतीत समस्याच समस्या आवासून आहेत. दोन कुटुंबांसाठी एक सार्वजनिक शौचालय आणि तेही घरापासून दोनशे मीटर अंतरावर आहे.

'Divya Below Down' in Police Colony | पोलीस वसाहतीत ‘दिव्याखाली अंधार’

पोलीस वसाहतीत ‘दिव्याखाली अंधार’

भंडारा : जिल्हा मुख्यालयी असलेल्या पोलीस वसाहतीत समस्याच समस्या आवासून आहेत. दोन कुटुंबांसाठी एक सार्वजनिक शौचालय आणि तेही घरापासून दोनशे मीटर अंतरावर आहे. रात्री अपरात्री शौचासाठी जाण्यासाठी महिला व मुलांना अडचणी येत आहेत.
शौचालयात वीज नाही
घरापासून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या या शौचालयात वीज नाही. त्या मार्गावरही वीज नाही. त्यामुळे एका हातात बालटी आणि दुसऱ्या हातात बॅटरी व तोंडाला रुमाल बांधून महिला, पुरुषांना शौचासाठी जावे लागत आहे. ज्याठिकाणी हे शौचालय आहेत, त्या परिसरात घाणच घाण असून सर्वत्र झुडूप वाढलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी साप, विंचू या श्वापदाचा सामना करीत त्यांना शौचालयात जावे लागत आहे. पावसाळ्यात तर एका हातात छत्री, दुसऱ्या हातात बॅटरी आणि बालटी घेऊन जावे लागत असल्याचे सांगितले. या वसाहतीत ३० ते ३५ वर्षांपूर्वी रुजू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची दुसरी पिढी पोलीस सेवेत दाखल झाली आहे. परंतु ही समस्या अद्याप सुटलेली नाही. त्यावेळी जशी परिस्थिती होती आताही तशीच परिस्थिती कायम असल्याचे खेडीकर, मडावी या वृद्धांनी सांगितले.
(जिल्हा प्रतिनिधी)
पती जनतेच्या सेवेत; आम्ही दुर्गंधीच्या त्रासात
आमचे पती जनतेची सेवा करतात. त्यामुळे शहराला सुरक्षेचे कवच मिळाले आहे. परंतु आम्ही दुर्गंधीच्या प्रदेशात खितपत पडलेलो आहोत. आमचे पती याबद्दल बंड करु शकत नाही. तसे केल्यास त्यांच्यावर निलंबनाची वेळ येते. त्यामुळे आता आम्ही महिलाच संघटीत होऊन तुमच्यापर्यंत धाव घ्यावी लागली असे सुनिता चुधरी, संगीता कुमरे, इंदिरा रहांगडाले, संगीता पटले, कविता लांजेवार, छाया आदमने, माधुरी मस्के, मिना वानखेडे, उषा अवसरे, विद्या डोंगरे, इंदू मडावी, सुनिता गेडेकर, किरण बगमारे, कविता देवसरे, सुनिता मेश्राम, रंजना वलथरे, कल्पना गायकवाड, गीता भोयर, रोशनी कटरे, सुनिता मेश्राम, किरण राठोड यांनी सांगितले.

Web Title: 'Divya Below Down' in Police Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.