देव्हाडी बायपास मार्ग जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:30 IST2018-11-11T21:29:30+5:302018-11-11T21:30:10+5:30
देव्हाडी बायपास दरम्यान न्यायपालिका मार्गावर गती नियंत्रक व हॉर्न प्रतिबंधीत फलकाचा अभाव असल्याचे दिसुन आले आहे. वाहतुक अधिनियमानुसार निवडक क्षेत्रादरम्यान मोडणा-या मार्गावर प्रतिबंधीत फलक लावण्यात येतात. त्यात न्यायपालिकेसमोरील मार्गावर हॉर्नचा वापर न करता नियंत्रीत गतीने वाहणे चालविन्याचे नियम आहे.

देव्हाडी बायपास मार्ग जीवघेणा
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर :देव्हाडी बायपास दरम्यान न्यायपालिका मार्गावर गती नियंत्रक व हॉर्न प्रतिबंधीत फलकाचा अभाव असल्याचे दिसुन आले आहे. वाहतुक अधिनियमानुसार निवडक क्षेत्रादरम्यान मोडणा-या मार्गावर प्रतिबंधीत फलक लावण्यात येतात. त्यात न्यायपालिकेसमोरील मार्गावर हॉर्नचा वापर न करता नियंत्रीत गतीने वाहणे चालविन्याचे नियम आहे. मात्र तुमसर शहरातील देव्हाडी बायपास मार्गावर असलेल्या न्यायपालिकेसमोरुन नियमांचे सर्रास उल्लंघन करुन वाहतुक सुरु आहे.
तुमसर शहरात दिवाणी व फौजदारी सत्र न्यायालय आहे. देव्हाडी बायपास दरम्यान गोवर्धन नगरात न्याय पालिकेची नविन ईमारत तयार करण्यात आली. न्यायालयिन प्रकरणे दुर्गा नगरातील जुन्या ईमारतीतुन नविन ईमारतीत स्थांनातरीत करण्यात आली. मात्र त्या मार्गावर गती नियंत्रक व हॉर्न प्रतीबंध दर्शविणारे फलक अद्दाप बसविन्यात आलेले नाही. तुमसर येथिल न्यायालयात प्रथम व द्वितीय श्रेणी न्यायाधीशांचे कक्ष आहे हे मात्र विशेष. त्यात त्या बायपासवरुन वेगवान गतीने वाहने धावतांना आढळुन येत आहेत. त्याच मार्गावर ६ नव्हेंबरच्या रात्री भरधाव ट्रकने एका ईसमाला चिरडल्याची घटना घडली होती. ती घटना न्यायपालिकेच्या १०० मी अंतरावर घडली होती. त्या मार्गावर अनियंत्रीत गतीने वाहने धावतात. मात्र वाहतुक नियंत्रक विभागाचे साधे सुचना फलकही त्या मार्गावर नाही. सध्या तुमसर शहरात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
नियमानुसार शहरातील रस्ते त्यांच्या स्थानाच्या आधारावर चार विभागांमध्ये विभागलेले आहेत. प्रमुख शॉपिंग झोन, शाळा आणि रुग्णालये यांसारख्या संभाव्य धोकादायक क्षेत्रांजवळ स्पीड मयार्दा कमी केली जाऊ शकते.
त्यात स्थानिक अधिका-यांना विशिष्ट क्षेत्रानुसार कमी वेग मयार्दा सेट करण्याची स्वातंत्र्य असते. देशात शहरातील रस्त्यांवर कारसीठी गतीची कमाल मयार्दा ७० किमी प्रतीतास ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यात मालवाहू वाहनांसाठी ६० किमी आणि दुचाकींसाठी ५० किमीपर्यंतची मयार्दा ठरविन्यात आली आहे. राज्य सरकार आणि त्या-त्या परिसरातील स्थानिक प्रशासनाला त्यांच्या अधिपत्याखालील रस्त्यावर धावणा-या वाहतुकीची गती नियंत्रीत करण्याचे अधिकार आहेत. रस्त्यावरील वाहतुकदारांना रस्त्यांच्या कडेला दर्शविन्यात आलेल्या चिन्हांच्यावर निर्दिष्ट केलेल्या वेग मयार्देचे पालन करण्याचे नियम आहेत. मात्र तुमसर शहरातील न्यायपालीका, शाळा, रुग्णालयीन मार्गावर वाहतुकीचे दिशानिर्देश सुचविणाऱ्या फलकांचा अभाव दिसुन येत आहे.
वाहतुक व मोटर वाहन नियम १९८८ नुसार मुख्य रस्त्यालगत शाळा, रुग्णालये, न्यायपालिका, उच्च स्तरीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरुन होणारी वाहतुक नियंत्रीत गतीने करण्याचे निर्बंध आहे. मात्र तुमसर शहरातील न्यायपालिका मार्गावर वाहतुक दारांकडुन नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. दरम्यान त्या मार्गाच्या दुतर्फा दाट लोकवस्ती आहे. गोंदिया मार्गे धावणारी वाहतुक याच मागार्ने होते. मात्र लोकवस्ती व प्रतिबंधीत क्षेत्र दर्शविणारे एकही फलक त्या मार्गावर लागलेले नाही. येथे संबंधित विभागाने वाहतुक नियमावलींचे फलक बसविन्याची गरज स्थानिकांमार्फत व्यक्त गेली जात आहे.