शहरात दूषित पाणीपुरवठा
By Admin | Updated: March 15, 2016 00:49 IST2016-03-15T00:49:29+5:302016-03-15T00:49:29+5:30
दूषित पाणी पुरवठ्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहरात दूषित पाणीपुरवठा
आरोग्य धोक्यात : समस्यांची नगरसेवकांनी घेतली दखल
भंडारा : दूषित पाणी पुरवठ्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याविषयी दिवसेंदिवस अनेक तक्रारी समोर येत आहेत. शहरातील समस्या निकाली काढण्यात यावे, यासाठी नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांनी नगरपरिषदेचे कर्मचारी पटेल व खोत यांना आदेश दिले आहे, नियमित शुद्ध पाणी पुरवठा लवकरच सुरू होणार असल्याचे आश्वासन दूषित पाण्याची पाहणी केल्यानंतर नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांनी दिली.
गत १५ दिवसांपासून म्हॉडा कॉलोनीतील नळाला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार महेंद्र निंबार्ते यांच्याकडे म्हॉडावासीयांनी केली होती. तक्रारीची दखल घेत नगरसेवक निंबार्ते यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता सत्यता दिसून आली. सोमवारी सकाळी नगरपरिषदेचे कर्मचारी पटेल व खोत यांनीसुद्धा परिस्थितीची पाहणी केली.
शहरातील दोन्ही टाक्यांमुळे शहरातील नागरिकांना मुबलक पाणी साठा होत नाही. त्यात अनेकवेळा दूषित पाण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते. यामुळे जनता त्रस्त झाली आहे. (नगर प्रतिनिधी)