जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; केवळ ८६ ॲक्टिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST2021-06-24T04:24:27+5:302021-06-24T04:24:27+5:30

बुधवारी जिल्ह्यात केवळ एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला. विशेष म्हणजे मंगळवारीही केवळ एकाच व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. १७ ...

The district's move towards coronation; Only 86 active patients | जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; केवळ ८६ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; केवळ ८६ ॲक्टिव्ह रुग्ण

बुधवारी जिल्ह्यात केवळ एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला. विशेष म्हणजे मंगळवारीही केवळ एकाच व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. १७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

बॉक्स

मृत्यूची संख्या नियंत्रणात

जिल्ह्यात गत महिनाभरापासून मृत्यूची संख्या नियंत्रणात आहे. गत २३ दिवसांत एक अपवाद वगळता मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ११२५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णसंख्येसोबतच मृत्यूही नियंत्रणात असून दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे.

बॉक्स

सूट मिळताच नागरिक झाले बेजबाबदार

कोरोना संसर्गाची दुसरी लाट आणि मृत्यूचे तांडव अनुभवल्यानंतरही नागरिक कोरोना नियमांचे पालन करताना दिसून नाही. बुधवारी भंडारा शहरातील भाजीबाजारासह विविध ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. गणेश शाळेच्या प्रांगणात भरविण्यात येणाऱ्या भाजीबाजारात पाय ठेवायलाही जागा नव्हती. विशेष म्हणजे अनेक जण मास्क लावलेले नव्हते. दुकानदारही मास्कशिवाय विक्री करताना दिसत होते. यामुळे पुन्हा कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे.

Web Title: The district's move towards coronation; Only 86 active patients