शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

जिल्ह्यात २० हजार क्विंटल बियाण्यांची टंचाई जाणवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 01:09 IST

खरीप हंगामाच्या पुर्व मशागतीचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहे. जिल्हा प्रशासनाने यावर्षीच्या हंगामासाठी १ लाख ९२ हजार हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे. त्यासाठी ४४ हजार ९५४ क्विंटल बियाण्यांची मागणी केली.

ठळक मुद्देखरीप हंगाम : मागणी ४४ हजार क्विंटल, बियाणे मिळाले २४ हजार क्विंटल

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामाच्या पुर्व मशागतीचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहे. जिल्हा प्रशासनाने यावर्षीच्या हंगामासाठी १ लाख ९२ हजार हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे. त्यासाठी ४४ हजार ९५४ क्विंटल बियाण्यांची मागणी केली. त्यापैकी आतापर्यंत केवळ २४ हजार १३४ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहेत. यामुळे २० हजार ८२० बियाणांचा अद्यापही तुटवडा निर्माण झाला आहे.भाताचे कोठार म्हणून सर्वश्रूत असलेल्या भंडारा जिल्ह्यात मागील वर्षी निसर्गाने साथ न दिल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. वरूणराजाने दडी मारल्याने अनेकांची पºहे करपून तर काहींची रोवणी पाण्याअभावी हातून गेली. त्यामुळे मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांच्या शेतीत धानाचे उत्पादन झाले नसल्याने शेती पडीक राहली. भंडारा जिल्हा दुष्काळाच्या छायेत असतांनाही प्रशासनाने दुष्काळातून बाद केल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. गतवर्षीची भर रब्बी हंगामात काढण्याचा शेतकºयांचा प्रयत्न वातावरण बदलामुळे फसला. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.यावर्षीच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने एक लाख ९२ हजार ६५० हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे. यात खरीप भात एक लाख ८० हजार हेक्टर, तुर १२ हजार १०० हेक्टर व सोयाबीन ५५० हेक्टर आहे. यावर्षी ४४ हजार ९५४ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली. यात भात पिकासाठी ४३ हजार ७३९ क्विंटल, तूर ८६५ क्विंटल व सोयाबीन ३५० क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. मात्र आजपर्यंत तूर ३४०, सोयाबीन १५०, तर भात २३ हजार ७६१, असे एकूण २४ हजार १३४ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. यावर्षी बियाण्यांचा तुटवडा जाणवणार नसल्याचे कृषी अधिकाºयांचे म्हणणे आहे.तसेच रासायनीक खतांसाठी ८६ हजार १०० मे.टन आवंटन मंजूर करण्यात आले आहे. यात युरिया ३८ हजार ७४० मे. टन, डीएपी १० हजार ६३० मे. टन, एसएसपी ११ हजार ३१०, एमओपी २ हजार ९८० व इतर संयुक्त खते २३ हजार ४४० मेट्रीक टनचा समावेश आहे. यापैकी आजपर्यंत ३७ हजार ७३४ मेट्रीक टन रासायनीक खतांचा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे.यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ९८ हजार २६० सभासदांना ४१४ कोटी ५० हजार रुपयांच्या कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले. मात्र अद्यापही बहुतांश शेतकरी कर्जापासून वंचित असल्याचे दिसून येते. याला कारणीभूत बँकेचे अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचे आदेश देत असले तरी दुसरीकडे मात्र बँकेचे अधिकारी कर्ज वाटपात टाळाटाळ करीत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. गतवर्षी ६९ हजार ४२४ शेतकºयांना ३२४ कोटी ७६ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते, हे विशेष.शेतकऱ्यांना आता पावसाचे वेधनवतपा ५ जून रोजी संपला आहे. मात्र अद्यापही उन्हाच्या झळा कायम आहे. शेतकरी पूर्व मशागतीच्या कामात गुंतला आहे. धुरे पेटविणे, काडीकचरा गोळा करणे, शेतात असलेली तणस सुरक्षीत ठेवणे, शेतात शेणखत घालण्याचे काम वेगात सुरु आहे. अनेकांची ही कामे आटोपली असून पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. परंतु पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.भरारी पथक सक्रियखरीप हंगामात बियाणे, खते, किटकनाशकांतून शेतकऱ्यांची फसगत होवू नये, यासाठी कृषी विभागाने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पथक तयार केले असून कृषी केंद्राची कसून तपासणी करीत आहे. दोषी केंद्र संचालकांविरुध्द कारवाईचे सत्र सुरु झाले आहे. तक्रार निवारणासाठी दुरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी