एलसीबीचे जिल्हाभर धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:38 IST2021-08-27T04:38:42+5:302021-08-27T04:38:42+5:30

मोहाडी तालुक्यातील वरठी येथे अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. तेथे आरोपी दिनेश धनराज उके, बिमलाकर ऊर्फ राजकुमार किसन ...

District-wide raids of LCB | एलसीबीचे जिल्हाभर धाडसत्र

एलसीबीचे जिल्हाभर धाडसत्र

मोहाडी तालुक्यातील वरठी येथे अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. तेथे आरोपी दिनेश धनराज उके, बिमलाकर ऊर्फ राजकुमार किसन लोणारे, विकास गजभिये, दिलीप दशरथ खोब्रागडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मोहाडी तहसील कार्यालयासमोर छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या सट्टापट्टीवर धाड मारली. तेथे लीलाधर लेहनदास बागडे रा. मोहाडी याच्यावर कारवाई करण्यात आली. कारधा ठाण्यांतर्गत एका महिला आरोपीविरुद्ध तुमसर येथे आनंद राजेश मालधरे, लाखांदूर येथे गुरुदेव शिवचरण शहारे रा. पिंपळगाव कोहळी, साकोली येथे रवींद्र मारोती मेश्राम, भाष्कर जगन बोरकर, चेतन युधिष्ठिर तरजुले रा. सेंदूरवाफा संदीश शेखराव मेश्राम, प्रमोद चंद्रभान दोनाडे रा. एकोडी, लाखनी येथे तुषार दुर्योधन कोडवते रा. गिरोला, दिनेश मिताराम वासनिक रा. राजेगाव, सीतासावंगी येथे दारूबंदी कायद्यामुळे दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण व स्थानिक पोलिसांनी केली.

Web Title: District-wide raids of LCB