जिल्हा दुग्ध संघाला ‘सहकार भूषण’

By Admin | Updated: June 24, 2015 01:08 IST2015-06-24T01:08:27+5:302015-06-24T01:08:27+5:30

सहकार क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघाला सहकार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

District Milk Union 'Sahakar Bhushan' | जिल्हा दुग्ध संघाला ‘सहकार भूषण’

जिल्हा दुग्ध संघाला ‘सहकार भूषण’

भंडारा : सहकार क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघाला सहकार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथे राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये यांनी हा शनिवारला पुरस्कार स्वीकारला.
भंडारा जिल्हा दुग्ध संघाने शेतकरी आणि उत्पादकांच्या हिताचे कार्य केले. दुध उत्पादन संकलन, विक्री, शेतकऱ्यांना नियमित चुकारे आदी करणे, योग्य भाव देणे, गुणवत्ता, प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता यामुळे दुग्ध संघाने प्रगती केली. नुकताच दुध भुक्ती प्रकल्पही कार्यान्वीत झालेला आहे. या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल यापुर्वी दूध संघाने सहकारनिष्ट पुरस्कार पटकाविला होता. संघाचे पारदर्शक कार्य व विकास लक्षात घेवून शासनाने २०१३-१४ या वर्षाचा सहकार भूषण पुरस्कार दुध संघाला जाहीर केला होता.
संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, कार्यकारी संचालक करण रामटेके यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी संघाचे संचालन आशिष पातरे, श्रीकृष्ण पडोळे, नरेश धुर्वे, कर्मचारी लक्ष्मीकांत गभणे यांच्यासह सहकार आणि दुग्ध विकास विभागाचे प्रधान सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: District Milk Union 'Sahakar Bhushan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.