स्काऊट गाईड्सचा जिल्हास्तरीय मेळावा
By Admin | Updated: January 23, 2016 00:57 IST2016-01-23T00:57:05+5:302016-01-23T00:57:05+5:30
जागरूक नागरिक घडविण्यासाठी स्काऊट्स गाईड्सचे मोठे योगदान राहिलेले आहे. जगात १८३ देशात विस्तार झालेल्या स्काऊट गाईडचा ही जागतिक स्तरावरील एक मोठी चळवळ आहे.

स्काऊट गाईड्सचा जिल्हास्तरीय मेळावा
भंडारा : जागरूक नागरिक घडविण्यासाठी स्काऊट्स गाईड्सचे मोठे योगदान राहिलेले आहे. जगात १८३ देशात विस्तार झालेल्या स्काऊट गाईडचा ही जागतिक स्तरावरील एक मोठी चळवळ आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी योगदान असलेल्या स्काऊट्स गाईड्स जिल्हा मेळावा उत्साहात पार पडला. चार दिवसीय चालणाऱ्या मेळाव्याचे उद्घाटन भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्काऊट गाईडचे जिल्हामुख्य आयुक्त डी.एफ. कोचे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार हे होते. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून जिल्हा मुख्य आयुक्त डी.एफ. कोचे, उपशिक्षणाधिकारी आयलवार यांनीउपस्थितांना मार्गदर्शन केले.
या मेळाव्याची सांगता २१ जानेवारीला बक्षिस वितरण समारोपाने करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान व्यासपिठावर जिल्हाआयुक्त त्रिवेणी खिस्ती, जिल्हा कोषाध्यक्ष देवयानी हुमणे, आर.के. मुन, जिल्हा सरचिटणीस वर्षा साखरे, पुरूषोत्तम काटेखाये, प्रशिक्षण आयुक्त गणेश सार्वे, अॅड. के.एल. पाटील, माजी सरपंच कविता मते, लता सार्वे, स्काऊट गाईडचे पदाधिकारी चंद्रकांत भगत, भिष्मा टेंभुर्णे, दिक्षा गद्रे, चेतना म्हणकर व सी.टी. वडीचार प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक निचत यांनी केले तर आभार श्रावण कळंबे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात स्काऊट गाईडचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)