जिल्हाधिकाऱ्यांची कोंढा येथील ग्रामपंचायतला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:33 IST2021-03-06T04:33:35+5:302021-03-06T04:33:35+5:30
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, तसेच शबरी आवास योजनामध्ये लाभार्थी किती, किती बांधकाम पूर्ण झाले, किती बांधकाम अपूर्ण ...

जिल्हाधिकाऱ्यांची कोंढा येथील ग्रामपंचायतला भेट
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, तसेच शबरी आवास योजनामध्ये लाभार्थी किती, किती बांधकाम पूर्ण झाले, किती बांधकाम अपूर्ण आहेत आणि किती अपात्र यादीत नावे आहेत यांचा सविस्तर आढावा घेतला. नंतर घरकुलांची पाहणी केली. महिला बचतगटाच्या महिलांसोबत संवाद साधला. आठवडी बाजाराच्या जागेची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. त्यांनी कोंढा येथे सुरू असलेल्या कामांची प्रशंसा केली.
या वेळी प्रकल्प संचालक मनीषा कुरसंगे, उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, गटविकास अधिकारी प्रमिला वाळूज, तहसीलदार नीलिमा रंगारी, नायब तहसीलदार हेमंत कामत, तालुका अभियान व्यवस्थापक रविता शेगावकर, कोंढाचे ग्रामविकास अधिकारी शैलेश खोब्रागडे, ग्रामपंचायत सदस्य गौतम टेंभुर्णे, संजय कुर्झेकर, तलाठी मानकर, अभियंता श्रीकांत मोटघरे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.