पुनर्वसनासाठी जिल्हा कचेरीवर धडकले ग्रामस्थ
By Admin | Updated: December 31, 2015 00:28 IST2015-12-31T00:28:43+5:302015-12-31T00:28:43+5:30
गोसीखुर्द धरणाचे पाणी अडविणे सुरू असताना सालेबर्डी गावाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली.

पुनर्वसनासाठी जिल्हा कचेरीवर धडकले ग्रामस्थ
सालेबर्डीचे पुनर्वसन करा : खोटी माहिती देणाऱ्यावर कारवाई करा
जवाहरनगर : गोसीखुर्द धरणाचे पाणी अडविणे सुरू असताना सालेबर्डी गावाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे सालेबर्डी-दवडीपार वासीयांचे पुनर्वसन करून शहापूर-मारेगाव येथे त्वरीत भुखंड वाटप करण्यात यावे, या मागणीला घेवून आज शेकडो प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. तसेच खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर संंबंधित विभागाने कारवाई करावी. न्याय न मिळाल्यास ६ जानेवारी नंतर लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा निर्वाणीचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
गोसीखुर्द प्रकल्पासाठी बाधीत क्षेत्राचे पुर्नवसन करण्याची प्रक्रिया १९९१ पासून सुरू झाली. १९९४ चा महापूर बघता सालेबर्डी गावाला पाण्याने वेढले होते.
दरम्यान ९ वाजता सभा घेण्यात आली. यात एकमुखी असा निर्णय झाला की, गावकऱ्यांना पुर्नवसन संदर्भात कोणताही आक्षेप नसतानाही भुखंड वाटप का थांबले. याची माहिती शासनानी ग्रामस्थांना द्यावी. याबाबत चुकीची माहिती देणाऱ्या त्या भामट्यावर कारवाही करावी. १० दिवसात भुखंड व पट्टे वाटप केलयास सालेबर्डी-दवडीपारवासी सरपंच जीजाबाई मेश्राम, उपसरपंच मनोहर मेश्राम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना ११२ ग्रामस्थांचे सह्याचे निवेदन देण्यास गेलेल्यांनी म्हटले. मात्र जिल्हाधिकारी यांची भेट ग्रामस्थासोबत झाली नाही. हे येथे उल्लेखनीय बाब. (वार्ताहर)