जिल्हा बँक पीककर्ज वाटपात पुढे
By Admin | Updated: May 18, 2016 00:34 IST2016-05-18T00:34:57+5:302016-05-18T00:34:57+5:30
शेती कसायला पिककर्ज अत्यंत आवश्यक आहे. कर्जाशिवाय शेती कसणे आजतरी आवश्यक आहे.

जिल्हा बँक पीककर्ज वाटपात पुढे
पालांदूर शाखेतील प्रकार : १,७१३ शेतकऱ्यांना कर्जवाटप
पालांदूर : शेती कसायला पिककर्ज अत्यंत आवश्यक आहे. कर्जाशिवाय शेती कसणे आजतरी आवश्यक आहे. खासगी कर्जाने शेतकऱ्यांना मृत्यूच्या दाढेत ओढल्याने शासनाने बँकेची दारे खुली केली. परंतु इतर बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याकरिता अपेक्षित सकारात्मक दाखवत नाही. मात्र जिल्हा सहकारी बँका राज्यात पुढे असून भंडारा जिल्हा सुद्धा अग्रेसर आहे. एकट्या पालांदूर शाखेने पाच कोटी २१ लाखांचे पिककर्ज वाटप शेतकऱ्यांना सहकार्य करीत शाखा व्यवस्थापक अनिल शहारे यांनी कमान सांभाळली आहे.
३८३ सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप प्रक्रिया राबविली जाते. जिल्हा बँक पिककर्जाची यशस्वी वाटचाल पुढे नेत शेतकऱ्यांच्या हिताकरिता प्राथमिकता देत आहे. याकरिता शिखर बँक, नाबार्ड, शासनस्तरावरून नियमीत सहकार्य लाभत आहे. व्यापारी बँका शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज देण्याकरिता प्राथमिकता देताना दिसत नाही. शून्य व्याजदर योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पिककर्ज शिवाय शेतकरी कसेल तो दिवस उजाडायला किती दिवस लागतील हे अनिश्चित आहे.
१२ एप्रिलपासून शाखा पालांदूरात पिककर्ज वाटप प्रक्रियेचा श्रीगणेशा करण्यात आला. शेतकऱ्यांनी सेवासहकारी संस्थेच्या माध्यमातून दरबारात बँकेत आणून तपासणी आटोपून लगेच संगणकावर नोंद घेत सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाते. आज शेतकरी जिल्हा सहकारी बँकेकडे बघतो आहे. जिल्ह्यातील सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांची नितांत गरज आहे. अत्यल्प कर्मचाऱ्यात पिककर्ज प्रमाणित न करता १२-१४ तास कामे करून शेतकऱ्यांना बँकेत पिककर्ज मिळत आहे.
पालांदूर शाखेत १,७१३ शेतकऱ्यांना ५ कोटी २१ लक्ष ९१ हजार रुपयांचे पिककर्ज केवळ महिनाभरात वाटप करण्यात आले. शाखा व्यवस्थापक अनिल शहारे, निरीक्षक यादव सोनकुसरे, लिपीक अमोल कापसे, रोखपाल उमेश वनवे, परिचर कैलाश भेंडारकर व सेवा सहकारी संस्था सचिव यांच्या सकारात्मक प्रयत्नातून एवढी मोठी मजल मारल्या गेली. चालू वित्तीय वर्षात ८ कोटीच्या पुढे वाटप १५ सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. दररोज पिककर्ज प्रक्रिया सुरु असून टप्प्याटप्प्याने प्रत् येक सोसायटीला न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पिककर्ज वाटप प्रक्रियेला गती देण्याकरिता जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे व संचालक मंडळ यांचे नियमित प्रत्येक शाखेवर नियंत्रण असून वेळोवेळी यथोचित मार्गदर्शनाने जिल्ह्यात सर्व बँकांच्या पुढे पिककर्ज वाटपात जिल्हा सहकारी बँक अग्र्रेसर आहे. (वार्ताहर)