कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:00 AM2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:01:07+5:30

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत असून संपूर्ण तयारी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुटी देण्यात आली आहे. या काळात मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मात्र शाळेत उपस्थित राहतील. शिक्षकांकडे कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करण्याचे काम दिल्याचे त्यांनी सांगितले. भंडारा जिल्ह्यात नऊ जण परदेशवारी करून आले आहेत.

District Administration Ready for Corona Prevention | कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

Next
ठळक मुद्देएम.जे. प्रदीपचंद्रन : जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद, परदेशातून आलेल्या नागरिकांवर करडी नजर, अफवा पसरवू नका

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कुठेही कोरोनाचा संसर्ग झालेला संशयीत रुग्ण आढळला नसला तरी जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्व यंत्रणा सज्ज केली आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला असून परदेशातून आलेल्या व्यक्तींवर प्रशासनाची करडी नजर आहे. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. सोशल मिडीयातून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत असून संपूर्ण तयारी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुटी देण्यात आली आहे. या काळात मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मात्र शाळेत उपस्थित राहतील. शिक्षकांकडे कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करण्याचे काम दिल्याचे त्यांनी सांगितले. भंडारा जिल्ह्यात नऊ जण परदेशवारी करून आले आहेत. रॅपीड रिस्पांस टीमने त्यांची भेट घेतली. त्यांना घरीच विलगीकरण करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत माहिती दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयात सुसज्ज असा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. तेथे ६० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याठिकाणी सर्व सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले. रॅपीड रिस्पांस टीम तयार करण्यात आली असून कुठेही संशय आल्यास ही टीम तात्काळ दाखल होईल, असे सांगितले. जिल्ह्यात कुणी संशयीत आढळल्यास त्याला तीन दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाईल. त्याचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतील. जिल्ह्यात एन-९५ मास्कसह मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर उपलब्ध आहेत. तालुकास्तरावरही पथक तयार करण्यात आले असून एक रुग्णवाहिका सज्ज असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील रुग्णालयातून निघणाºया जैविक कचरा नष्ट करण्यासाठी विशेष उपाययोजना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आठवडी बाजार बंद
कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी सोमवारी दिले. त्याअंतर्गत नगरपरिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत क्षेत्रात भरणारे आठवडी बाजार व गुरांचे बाजार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान मंगळवारी जिल्ह्याच्या काही गावात आठवडी बाजार भरविण्यात आला होता. पुरेशी माहित न मिळाल्याने आठवडी बाजार भरविल्याचे सांगण्यात आले.
भ्रूशुंड गणेश मंदिर बंद
विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले भंडारा येथील प्रसिद्ध भ्रूशुंड गणेश मंदिर ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. याबाबत त्यांनी मंदिराच्या दर्शनी भागावर फलक लावलेला आहे.
नगरपरिषदेकडून स्वच्छता मोहीम
भंडारा नगरपरिषदेच्या वतीने कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता अभियान सुरु केले आहे. शहरातील विविध भागातील केरकचरा गोळा केला जात आहे. तसेच ध्वनीक्षेपकावरून नागरिकांना स्वच्छतेबाबत सूचना दिल्या जात आहेत. नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम स्थगित
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी दिले आहेत. त्यामुळे मंगळवारपासून निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने २८ फेब्रुवारीपासून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार १३ मार्चला आरक्षण सोडत काढण्यात आली. १६ मार्च रोजी प्रभाग रचनेची अधिसूचनाही जारी झाली. २३ मार्चपर्यंत प्रभाग रचना व आरक्षणावर आक्षेप नोंदविणे आणि ३० मार्चला आक्षेपावर सुनावणी आणि ३ एप्रिल रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार होती. मात्र आता कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत स्थगीत करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका पुढे जाण्याची शक्यता आहे.

साठेबाजांवर कारवाई
मास्क आणि सॅनिटायझरची साठेबाजी करणाºयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्रामसेवक, तलाठी, आशा सेविका आणि पोलिसांचे पथक निर्माण करण्यात आले असून त्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. लग्न सोहळे करताना मोठी गर्दी होणार नाही याची संबंधितांनी खबरदारी घ्यावी. जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीतच लग्नसोहळे पार पाडावे, असे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी सांगितले.

श्रीराम नवमी शोभायात्रा रद्द
श्रीराम शोभायात्रा ही भंडारा शहराचे भूषण असून ४९ वर्षापासून अविरत सुरु आहे. मात्र कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव लक्षात घेता यावर्षी ही शोभायात्रा रद्द करण्याचा निर्णय श्रीराम शोभायात्रा समितीने घेतल्याची माहिती समितीचे विश्वस्त धनंजय दलाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. शोभायात्रा आयोजनाच्या दृष्टीने भंडारा येथे कामाला सुरुवात करण्यात आली होती. २५ मार्च रोजी गुढीपाडवा आणि २ एप्रिलला रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या प्रकोपामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे. नागरिकांनी रामनवमीच्या दिवशी आपल्या घरावर भगवा झेंडा लावून श्रीराम जन्मोत्सव साजरा करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Web Title: District Administration Ready for Corona Prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.