जिल्ह्यात ११ पाॅझिटिव्ह, आठ जणांची काेराेनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:34 IST2021-02-13T04:34:57+5:302021-02-13T04:34:57+5:30
भंडारा : जिल्ह्यात शुक्रवारी ११ व्यक्ती पाॅझिटिव्ह, तर आठ जणांनी काेराेनावर मात केली. सध्या जिल्ह्यात १०३ ॲक्टिव्ह काेराेना ...

जिल्ह्यात ११ पाॅझिटिव्ह, आठ जणांची काेराेनावर मात
भंडारा : जिल्ह्यात शुक्रवारी ११ व्यक्ती पाॅझिटिव्ह, तर आठ जणांनी काेराेनावर मात केली. सध्या जिल्ह्यात १०३ ॲक्टिव्ह काेराेना रुग्ण आहेत.
शुक्रवारी ४२९ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले हाेते. त्यापैकी भंडारा तालुक्यात १, तुमसर ६, पवनी २, लाखनी २ असे ११ रुग्ण आढळून आले, तर ८ जणांनी काेराेनावर यशस्वी मात केली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात कुणाचाही काेराेनाने मृत्यू झाला नाही. मृतांची संख्या ३२६ आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २२ हजार ४८८ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी १३ हजार ३४५ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या हाेत्या. त्यापैकी १२ हजार ९१६ व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली आहे.
आतापर्यंत भंडारा तालुक्यात ५५४४, माेहाडी १०५५, तुमसर १६८४, पवनी १२७१, लाखनी १४४९, साकाेली १६९१, लाखांदूर ६५१ रुग्ण आढळून आले आहेत. गत काही दिवसांपासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांच्या संख्येत घट हाेत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने काेराेना निर्मूलनासाठी विविध उपाययाेजना सुरू आहेत.