विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:18 IST2020-12-28T04:18:42+5:302020-12-28T04:18:42+5:30

तुमसर तालुक्यातील मोठागाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेत कुशाबराव नामदेव भोयर विद्यार्थीप्रिय शिक्षक कार्यरत होते. ...

Distribution of school materials to students | विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

तुमसर तालुक्यातील मोठागाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेत कुशाबराव नामदेव भोयर विद्यार्थीप्रिय शिक्षक कार्यरत होते. कोरोना संक्रमण काळात दोन महिन्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांची शुक्रवारी जयंती होती. या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबीयांनी मोठागाव शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर लेखन साहित्य चॉकलेट आदींचे वाटप केले. यावेळी कुशाबराव यांच्या आठवणी सहकारी शिक्षकांनी काढल्यावर सर्वांचे डोळे पाणावले. विद्यार्थ्यांना सुद्धा अश्रु अनावर झाले.

याप्रसंगी कुशाबरावांचे कुटुंबीय प्रणय भोयर, समीक्षा भोयर, मुख्याध्यापक विजय ठीसके, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस डी. डी. दमाहे, शिक्षक अरुण बघेले, आदेश बोंबरडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवांगणा मुंगूसमारे, विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Distribution of school materials to students